रांजणगाव सांडस, ता.३० : शिरूर तालुक्यांच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे भाजीपाला तसेच तरकारी पिके, जनावरांचा हिरवा चारा त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पाण्यामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्याचे आर्थिक गणित बिघडल्याने कंबरडे मोडले आहे. आडसाली ऊस लागवड करण्याचे नियोजनही पूर्णपणे कोलमडले आहे.
भीमा -मुळा- मुठानदीला मे महिन्यातच पुराचे प्रथम पाणी आले आहे. रांजणगाव सांडस परिसरात दररोज रिमझिम पावसासह मुसळधार पावसासह वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह दररोज पावसाच्या सरी कोसळत आहे. जमिनीला प्रथमच मे महिन्यात पाझर फुटला असून ओढ्यांनाही पाणी येत आहे. तर तळेगाव ढमढेरे- न्हावरे या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्याने या परिसरात पाऊस चालू असल्यामुळे वाहन चालकाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तसेच या परिसरातील गावांतील पुराचे पाणी भीमा -मुळा- मुठा नदीला येऊन मिळत असल्यानेही नदीच्या पाणी पातळीत मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, आरणगाव, उरळगाव, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी ,नागरगाव आदी गावातील सखल भागातील शेतीपिकेही पाण्याखाली गेली आहेत.
पालक,कोथींबीर, मेथी, फ्लावर, कोबी, शेपू आदी पिके सडून गेली आहेत. टोमॅटो, मिरची, कारली, दुधी भोपळा आदी पिकांची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तर काही पिकांचे नुकसानही झाले आहे. वीज वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शेताची मशागत करण्याच्या अगोदरच शेत पाण्याने तुडुंब भरले आहे. शेतातील पाणी आटून वापसा येण्यास अधिक कालावधी जाणार असून, त्यातच मॉन्सून सक्रिय झाला तर अडसाल्या ऊस लागवडीचा खोळंबा ऊस लागवडीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
02924
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.