पुणे

आलेगाव पागातील वीजपुरवठा खंडित

CD

रांजणगाव सांडस, ता. १९ ः आलेगाव पागा (मायदरमळा रोहित क्रमांक एक, ता. शिरूर) येथे चोरट्यांनी शेतातील विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा आणि ऑइलची चोरी केल्याची घटना बुधवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महावितरणचे वायरमन प्रकाश भोसले (रा. आलेगाव पागा) यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी (ता. १९) पहाटे पावणेतीन वाजता स्थानिक शेतकरी विष्णू काशिनाथ वाघचौरे आपल्या मायदरमळा येथील शेतातील विहिरीची मोटर चालू न झाल्याने शेतामध्ये गेले असता, यावेळी त्यांना शेतातील विद्युत रोहित्र फोडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सकाळी महावितरणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, चोरट्यांनी रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा व ऑइल लंपास केल्याचे उघड झाले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश शिंदे करत आहेत.

03094

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT