पुणे

श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

CD

शिनोली, ता. ३१ : श्री. क्षेत्र भीमाशंकरला दाट धुक्यात हरवले भीमाशंकर परिसर दुसऱ्या अधिक श्रावण सोमवारी ‘भीमाशंकर महाराज की जय’ घोषणांनी दुमदुमला आहे. दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले.

सुमारे दोन लाख भाविकांनी शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. कोकणातून कर्जत ते खांडजमार्गे गणपती घाटाने पायी भाविकांचा ओघ सुरू आहे. परंतु, घाटात पायपीट करून आल्यावर वन्यजीव विभागाकडून प्रतिभाविक ६० रुपये प्रमाणे पैसे घेत असल्याने भाविक व पर्यटक नाराजी व्यक्त करत होते.

भर पावसात पायरीमार्गावरील छत काढलेल्या ठिकाणी व प्लास्टिक कागदाने केलेल्या दर्शनबारीत भाविक भिजत आहेत. तर गळक्या छतातून पडणाऱ्या पावसामुळेही भाविक भिजत होते. तसेच महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना दोन किलोमीटर पावसात पायी चालत महादेवाचे दर्शन घ्यावे लागत असल्याने लहान मुले, वृध्द व महिलांचे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT