पुणे

लोणीतील अपघातात आठ प्रवासी जखमी

CD

इंदापूर, ता. २ : लोणी देवकर (ता.इंदापूर) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एसटी बसला मारुती इको या मोटारीने येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची तळेगाव आगाराची बस पुणेवरून अक्कलकोटकडे निघाली होती. लोणी देवकरचे हद्दीत एसटीचा पुढील डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभा केली. यावेळी टायर बदलत असताना पाठीमागून पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने वेगात निघालेल्या मोटारीने उभ्या असलेल्या एसटी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
मोटारीतील गजानन थिटे (वय ६५), गौरी गजानन थिटे (वय ५५), नथुराम गजानन थिटे (वय ३५), निवेदिता नथुराम थिटे (वय २६), ऋत्विक नथुराम थिटे (वय ४, सर्व रा.बहे ता. रोहा), ओम (पूर्ण नाव समजू शकले नाही) (वय ८), भगवान आबाजी तुपकर (वय ६१), भारती भगवान तुपकर (वय ५०) (सर्व रा. मुठवली खुर्द ता.रोहा, जिल्हा रायगड) हे जखमी झाले असून यापैकी दोन गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

03656

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT