पुणे

मॉन्सूनपूर्व सांघिक प्रकाश सापळे लावून नुकसान टाळा

CD

शिर्सुफळ : ता : २७ : ''पीक वाढीच्या बहुतांश अवस्था जमिनीखाली पार पडतात. त्यामुळे पिके उगवल्यानंतर रासायनिक फवारण्यांवर शेतकऱ्यांचा होणारा आर्थिक खर्च व शेतपिकाचे नुकसान टाळण्याकरिता मान्सूनपूर्व सांघिक पद्धतीने प्रकाश सापळे लावून नियंत्रण केल्यास भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळा,'' असे आवाहन कृषी सहायक प्रतिक्षा दराडे यांनी केले.

शिर्सुफळ येथील महादेव आटोळे यांच्या शेतात हुमणी किडीच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम सोमवारी (ता.२२) पार पडला. यावेळी हुमणी नियंत्रणाकरिता प्रकाश सापळे बसविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. हुमणी कीड प्रजातीच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट हा काळ महत्त्वाचा असतो. हुमणीच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोष व भुंगेरा या चार अवस्था आढळतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुप्तावस्थेत गेलेले भुंगेरे कोष बनून उन्हाळभर जमिनीत राहतात. मॉन्सूनपूर्व उन्हाळी पाऊस व ढगाळ वातावरणात सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भुंगेरे बाहेर पडतात. नर व मादी भुंगेऱ्यांचे मिलन होऊन मादी जमिनीत १० सेंटीमीटर खोलीवर सरासरी ६० अंडी घालते. शेतात एकरी दहा हजारांपुढे अळ्या असतील, तर ४० ते १०० टक्के नुकसान होते. अशा हुमणीचे सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सांघिक पद्धतीने प्रकाश सापळे लावून नियंत्रण करता येते.
कार्यक्रमास कृषिमित्र अण्णासाहेब आटोळे तसेच शेतकरी महादेव आटोळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती
खरीप हंगाम २०२३ अंतर्गत घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी, बियाणे बीजप्रक्रिया, हुमणी कीड नियंत्रणप्रकाश सापळे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग लागवड, प्रधानमंत्री कृषी सूक्षम अन्न प्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना, १ रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजना, इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली.


03833

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT