पुणे

इंदापुरातील २३ शाळांचे ‘शतक’

CD

इंदापूर, ता. २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील २३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तालुक्याचा एकूण सरासरी निकाल ९५.२५ टक्के लागला.
इंदापूर तालुक्यातील १०१ शाळांमधील ६ हजार ४३४ विद्यार्थांनी विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. यामध्ये ६ हजार १२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्रावीण्य घेऊन २ हजार ६१७ विद्यार्थी, अ श्रेणीत २ हजार २०८ विद्यार्थी, ब श्रेणीत १ हजार ७७ विद्यार्थी व पास श्रेणीत २२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा- भारत चिल्ड्रेन ॲकॅडमी वालचंदनगर, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण, वसंतदादा पाटील विद्यालय निरवांगी, माध्यमिक विद्यालय तावशी, श्री हनुमान विद्यालय अवसरी, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, जिजामाता विद्यालय सराटी, कै. शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय शहाजीनगर रेडा, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व्याहळी, लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे, माध्यमिक विद्यालय गिरवी, शंभू महादेव विद्यालय दगडवाडी, विठ्ठलराव थोरात माध्यमिक इंग्लिश मीडियम स्कूल भिगवन, डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम आनंदनगर, एल.जी.बनसोडे विद्यालय पळसदेव, श्री नागेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल शेटफळगढे, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सराटी, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी, श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, श्री वेंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानिकेतन लाखेवाडी व मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल शेळगाव.

इतर शाळांचा निकाल - बोरी हायस्कूल (९५.८३), श्रीवर्धमान विद्यालय वालचंदनगर (९८.९६), श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर (८८.४८), श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर (८९.९२), श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव (९४.६९), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी (९७.७२), भैरवनाथ विद्यालय भिगवन (९७.९७), श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी (९७.१७), वालचंद विद्यालय कळंब (९८.५९), श्री पळसनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव (९६.०), निमसाखर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल निमसाखर (९८.७३), श्री शिवाजी विद्यालय बावडा (९२.२७), श्री नीलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे (९८.४०), श्री काटेश्वर विद्यालय काटी (९५.२९), सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर (८१.६०), नागेश्वर विद्यालय शेटफळगढे (९५.६१) न्यू इंग्लिश स्कूल डाळज (९८.६१), श्री हरणेश्वर विद्यालय कळस (९७.६७), चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर (९८.७०), श्रीनाथ विद्यालय वडापुरी (७८.५७), रणगाव हायस्कूल रणगाव (९०.९०), प्रगती विद्यालय लोणी देवकर (९७.४३), नंदिकेश्वर प्रगती विद्यालय सराफवाडी (९७.७२), श्री छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल भवानीनगर (९६.१५), श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे (८८.४६), पवार माध्यमिक विद्यालय भवानीनगर (९०.६२), महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द (९८.१८), श्री बाबीर विद्यालय रुई (९७.०५), माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली (९६.१५), श्रीराम विद्यालय भोडणी (९५.२३), श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी (९५.२३), श्री छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानीनगर (९७.७२), अनंतराव पवार विद्यालय नीरनिमगाव (९१.८०), लोकनेते महादेवराव बोडके विद्यालय पिंपरी (९४.२०), माध्यमिक विद्यालय भांडगाव (९६.६६), दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव (९६.८२), माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी (९४.५९), श्री छत्रपती हायस्कूल सणसर (८५.९६), श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बुद्रुक (९८.६३),कमल विद्यालय बाभूळगाव (९७.२९), शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय लाखेवाडी (९६.२९), नूतन माध्यमिक विद्यालय कौठळी (९७.५०), प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर (९६.९६), राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर (८८.२३), गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतोंडी (९८.७१), सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला अंथुर्णे (८८.८८), श्री एन के व्यवहारे विद्यालय पिंपरी बुद्रुक (७६.५९), महात्मा फुले विद्यालय बिजवडी (९४.१८), शंभर टक्के माध्यमिक विद्यालय बोराटवाडी (९३.०५), उदमाई विद्यालय घोलपवाडी (९३.३३), श्री हनुमान विद्यालय सुरवड (९८.०३), न्यू इंग्लिश स्कूल लाकडी (९६.६६), नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन
(९५.४०), अंकलेश्वर माध्यमिक विद्यालय अकोले (९६.८७), न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय काझड (९६.६१), मालोजीराजे विद्यालय इंदापूर (२५), गोतोंडी विद्यालय गोतोंडी (९२), माध्यमिक विद्यालय वीरवाडी (९६.८७), माध्यमिक विद्यालय खोरोची (९३.५४), पद्मश्री अनंतराव पवार कृषी विद्यालय बोरी (८७.५०), समाजरत्न शिवाजी शेंडगे विद्यालय तरंगवाडी (८९.६५),श्री काळभैरव माध्यमिक विद्यालय कळाशी (७७.४१), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा इंदापूर (७६.९२), आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवन (९८.८०), श्री छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी (९४.७३), श्री छत्रपती हायस्कूल परीटवाडी (६६.६६), श्री छत्रपती हायस्कूल उद्धट (७५), महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी (७९.३१), एस. बी. पाटील पब्लिक स्कूल वनगळी (९८.११), कोंडीराम सदाशिव शिरसागर माध्यमिक विद्यालय (९५.८३), शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नीरा नरसिंहपूर (९८.८०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT