पुणे

इंदापुरात कोयत्याने वार; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

CD

इंदापूर, ता.८ : इंदापूर शहरात हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडण झाले. त्याचा राग मनात धरून जातिवाचक शिवीगाळ करत कोयत्या वार केले व लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याची घटना इंदापूर शहरात घडली. याबाबत विकास देवकर, चिकास देवकर आणि साधू पवार (सर्व रा. सरडेवाडी ता. इंदापूर) यांच्यासह आठ ते नऊ अज्ञात व्यक्ती विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विवेक विनय मखरे (रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.७) इंदापूर बायपास लगत असलेल्या हॉटेल पायल येथे बिल देण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून शहरातील टेंभुर्णी नाका येथे तीन आरोपींसह आठ ते नऊ जणांनी हातातील कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात, हातावर वार करून पायालाही जबर मारहाण करीत जखमी केले. यावेळी फिर्यादीचा भाऊ केवल हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यासही मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादिमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, जखमींवर इंदापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT