पुणे

मुक्त जीवन ही आरोग्याची गुरुकिल्ली

CD

इंदापूर, ता. १८ : स्पर्धेच्या युगात देखील ताण-तणावाचे योग्य नियोजन करिता तणाव मुक्त जीवन आणि पौष्टिक आहार ही आरोग्याची यशस्वी गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.

राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशन व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्यावतीने युवतींसाठी मुलींचे आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व या विषयावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना खाडे व ‘आयुर्वेद आणि दिनचर्या’ या विषयावर डॉ. अश्विनी ठोंबरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते केले.

यावेळी अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, नियमित व्यायाम केल्यास सकारात्मक ऊर्जा तयार होते. मनाला सकारात्मक ऊर्जा दिली तर आपण चांगले विचार करून आपली कार्यात्मक सिद्धता आत्मसात करू शकतो. सेंद्रिय पद्धतीचा आरोग्यदायी आहार, घरच्या घरी बनवलेले पदार्थ तसेच आयुर्वेदिक परंपरेची आदर्श जीवन पद्धती आत्मसात करण्यासाठी आपण प्राधान्य द्यावे.
''मुलींचे आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व'' या विषयावर बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना खाडे यांनी हिमोग्लोबिन चांगला राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, विश्रांती याला अधिक महत्त्व आहे. शरीर मन यांची सुदृढता म्हणजे आरोग्य होय. यावेळी त्यांनी स्त्री आरोग्यासंबंधी आवश्यक असणाऱ्या आरोग्य संबंधीची माहिती दिली.

''आयुर्वेद आणि दिनचर्या ''या विषयावर बोलताना डॉ. अश्विनी ठोंबरे म्हणाल्या, आपली दिनचर्या योगा, प्राणायाम, मेडिटेशन अशी असली पाहिजे यातून शरीर प्रसन्न राहते. अनेक आजारापासून आपण दूर राहतो. स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे. आपण व्याधीमुक्त आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर शारीरिक आरोग्य देखील चांगले राहते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ.शिवाजी वीर, क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ, उपप्राचार्य
प्रा. दत्तात्रेय गोळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा पूजा शिंदे-ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.मनीषा गायकवाड व प्रा.मृदल कांबळे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.कल्पना भोसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT