पुणे

शिर्सुफळ यात्रोत्सवात लाखो भाविकांचा सहभाग

CD

शिर्सुफळ, ता. १५ : येथील ग्रामदैवत श्री शिरसाई यात्रा उत्सव लाखों भाविकांच्या सहभागाने आनंदात पार पडला. यात्रेला गुरूवारी (ता. २) रोजी घटस्थापना होऊन सुरवात झाली. या यात्रेची सांगता रविवारी (ता. १२) रोजी झाली. यात्रेच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होऊन देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. श्री शिरसाई माजी विद्यार्थी संघाने येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
यानिमित्त श्री शिरसाई मातेच्या मूर्तीला फुलांनी सजावट केली होती. मंदिरावर विविध रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. देवीची पालखी व छबिना ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाल्यावर गावातील महिलांनी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. पालखीच्या मानकऱ्यांचे औक्षण केले. यात्रेनिमित्त पहाटे तीन वाजता पूजा, काकडा आरती, देवीला चोळी-पातळ, तसेच सकाळी सातच्या सुमारास दंडवत आणि दर्शनासाठी भाविकांची सुरवात केली होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देवीला नैवेद्य आणि श्रीफळ फोडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रविवारी (ता. २३) रात्री बारा वाजता रावणगाव (ता. दौंड) यांचा फटाक्यांच्या आतषबाजीसह रावण दहनाचा कार्यक्रम झाला. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले होते.

मंदिराच्या शेजारी असणाऱ्या भक्ती निवासाच्या भिंतीवर गावचा इतिहास सांगणारे बोलके चित्र ग्रामपंचातीच्या माध्यमातून काढण्यात आले होते. या बोलक्या चित्राने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रासोबत अनेक भाविकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

यात्रा काळात वाहनांना व व्यावसायिकांना अडथळा होऊ नये आणि इतर अडचणींना सामोरो जावे लागू नये, यासाठी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीकडून फ्लेक्स लावण्यावरती बंद घालण्यात आली होती. या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक करत नियमांचे पालन केले. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने यात्रेच्या आधी परिसरातील रस्त्यांची दुरूस्ती केली. वाहतूक कोंडी न होण्यासाठी बारामती ग्रामीण पोलीस, शिर्सुफळ ग्रामपंचायत, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी विविध उपायोजना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Kuno Cheetah: भारतात चित्त्यांचे 'अर्धशतक' पूर्ण! ज्वालाने दिला ५ पिल्लांना जन्म; कूनोमध्ये आता चित्त्यांची संख्या ५३ वर!

Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात

SCROLL FOR NEXT