इंदापूर, ता. २१ : बारावीच्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील २३ शाळा शंभर नंबरी ठरल्या असून, या शाळांचा निकाल १०० टक्के लागला. विशेष बाब म्हणजे १८ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर फक्त पाच शाळांचा निकाल हा ९० टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे. इंदापूर तालुक्याचा एकूण सरासरी निकाल ९६.५१ टक्के लागला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील ४६ शाळांमधील ६ हजार ५६८ विद्यार्थांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ८० विद्यार्थी परीक्षेमध्ये गैरहजर होते. प्रत्यक्षात ६ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. यामध्ये ६ हजार २६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य घेऊन १ हजार ७२० विद्यार्थी, अ श्रेणीत २ हजार ७५९ विद्यार्थी, ब श्रेणीत १ हजार ५८७ विद्यार्थी व पास श्रेणीत १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, २२६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
तालुक्यातील एकूण ४६ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये २३ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के, १८ महाविद्यालयाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला तर ५ कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा कमी लागला.
शंभर टक्के निकाल लागलेली कनिष्ठ महाविद्यालये व कंसात टक्केवारी- केतकेश्वर कनिष्ठ महाविद्यालय निमगाव केतकी, भारत चिल्ड्रेन ॲकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर, कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुरवली, उदमाई विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज घोलपवाडी, श्री छत्रपती हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अंथुर्णे, श्री काटेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज काटी, श्री हरणेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कळस, जिजामाता माध्यमिक अँड उच्च माध्यमिक विद्यालय सराटी, नागेश्वर विद्या लय अँड ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे, सौ. के. एस. के. व्ही. कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर, एल. जी. बनसोडे विद्यालय पळसदेव, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वनगळी, डॉ. कदम जीवन विकास प्रशाला इंदापूर, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, श्री शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, जिजाऊ इन्स्टिट्यूट इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय लाखेवाडी, मॉडर्न इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय शेळगाव, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब, श्री केतकेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज (व्यवसाय शिक्षण विभाग) निमगाव केतकी, श्री शिवाजी विद्यालय अँड कनिष्ठ महाविद्यालय (व्यवसाय शिक्षण विभाग) बावडा, कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण इंदापूर.
९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागलेले कनिष्ठ महाविद्यालये व कंसात टक्केवारी- श्री वर्धमान विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर (९८.२३), श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर (९७.०७), वालचंद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कळंब (९८.४३), भैरवनाथ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय भिगवन (९८.१३), श्री नीलकंठेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय लासुर्णे (९६.६१), श्री छत्रपती हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय भवानीनगर (९८.२४), गोविंदराव पवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय भवानीनगर (९०.८१), श्री पळसनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव (९९.५५), श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बावडा (९६.८६), निमसाखर एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर (९७.१४), दगडू दादा बनसोडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गोतोंडी (९६.००), नंदकिशोर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय जंक्शन (९९.६२), माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी (९७.६७), राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर (९५.५५), कला महाविद्यालय भिगवन (९८.१८), विठ्ठलराव थोरात इंग्रजी माध्यम हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण (९९.५१), के. एस. क्षीरसागर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (९८.०३), कै. साहेबराव फडतरे कनिष्ठ महाविद्यालय (९९.६८).
९० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेली कनिष्ठ महाविद्यालये- कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर (७०.४९), चैतन्य विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नीरा नरसिंहपूर (७७.७७), विठ्ठलराव
थोरात टेक्निकल महाविद्यालय (८५.७१), इंदापूर शासकीय टेक्निकल महाविद्यालय (७७.७७), कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभाग इंदापूर (७८.२६).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.