पुणे

इंदापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागात वरुणराजाची हजेरी

CD

इंदापूर, ता. ८ : इंदापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागात सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे बळिराजा मधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या पावसामुळे टँकर सुरू असलेल्या तालुक्यातील अनेक भागातील गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
इंदापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. इंदापूर शहराप्रमाणे तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली असून अशाच आणखीन दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. यंदा तीव्र उन्हाळा जाणवत होता त्यातच पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. पावसाला सुरुवात झाल्यामुळे पावसाचा जोर जर असाच राहिला तर काही अंशी ही टंचाई कमी होणार आहे.
शनिवारी (ता. ८) देखील इंदापूर शहर व ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. दुपारपासून पावसाला सुरूवात होत असून रात्री उशिरापर्यंत हा पाऊस बरसत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने अनेक गावे रात्रभर अंधारात राहत आहेत. शहरात देखील दिवसभर वीजपुरवठा बऱ्याच वेळा खंडित होत होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली असून मॉन्सून देखील चांगला होईल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT