पुणे

इंदापुरातून तुकोबांची पालखी सराटीकडे मार्गस्थ

CD

इंदापूर, ता. ११ ः संत तुकाराम महाराज यांचा देहू ते पंढरपूर पालखी सोहळा इंदापूर येथील मुक्काम आटोपून गुरुवारी (ता.११) पहाटे पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या सराटीकडे मार्गस्थ झाला. यावेळी इंदापूरकरांनी अतिशय भक्तिमय वातावरणात पालखीला निरोप दिला.

संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे रिंगण बुधवारी (ता.१०) इंदापूर शहरातील कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर पार पडले. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात पालखी सोहळा मुक्कमासाठी विसावला. यादरम्यान इंदापूरकरांच्या पाहुणचाराने वैष्णवजन सुखावल्याचे सुखद चित्र पाहायला मिळाले. तसेच यंदा एकच दिवस मुक्काम असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठीची गर्दी रांग रात्री उशिरापर्यंत कायम होती. तर घरोघरी वारकऱ्यांच्या पाहुणचार करण्यात महिला भगिनी व्यस्त होत्या. तसेच प्रशासकीय भवन शेजारील मैदानावर पाळणे, खेळणी, विविध मनोरंजनाचे खेळामुळे संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

दरम्यान विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना दानशूर व्यक्ती, शाळा महाविद्यालये यांच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी वैष्णवांना अल्पोपाहार, पाणी बाटल्या, फळे, बिस्कीट पुढे, चहा, फराळाचे पदार्थ, अत्यावश्यक औषधे, कापडी पिशव्या यांचे वाटप केले. तर घरोघरी वैष्णवांना जेवणाच्या पंगती घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे इंदापूरकरांच्या पाहुणचाराने वैष्णवजन भारावून गेले होते. गुरुवारी पहाटे आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या सराटीच्या दिशेने मार्गस्थ झाला. या मार्गावरही ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले.

इंदापूरला यात्रेचे स्वरूप
इंदापूरमध्ये पालखी सोहळ्याला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या निमित्ताने बाह्यवळण मार्गालगत, प्रशासकीय इमारतीलगत मुलांसाठी पाळणे, मनोरंजनाचे स्टॉल, विक्रेते, यांची मोठी गर्दी होती. त्यास इंदापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये पालखी सोहळ्यात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पालखीदर्शनासह नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला. यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, गेल्या वर्षीपासून पालखीचा मुक्काम शहराच्या बाहेर गेल्याने शहरातील मुख्य पेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT