पुणे

इंदापूरच्या राजकारणाला कलाटणी

CD

इंदापूर, ता. ४ : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या प्रवेशाची तारीख आणि ठिकाण जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, विलास वाघमोडे, लालासाहेब पवार, देवराज जाधव, शरद जामदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘गेली दोन महिने तालुक्याच्या विविध भागाचा दौरा केला. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की, काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. यावरून चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक झाली. यावेळी इंदापूरचे जागा महायुतीमधील घटक पक्षाला असल्याने आपल्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढू, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, तो मार्ग माझ्या वैयक्तिक स्वार्थाचा ठरला असता. म्हणून मी त्यास नकार दिला. त्यानंतर गुरुवारी (ता. ३) शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. तसेच, जयंत पाटील यांचीही त्यावेळी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली. त्यानुरूप शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी तुम्ही आमच्या पक्षात यावे, असा आग्रह धरला. त्यानुसार सर्वांशी केलेल्या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहे.’’
‘‘हा निर्णय घेत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील यांनाही याबाबत कल्पना दिली आहे. यामध्ये भूमिका घेत गेल्या दहा वर्षात इंदापूर तालुक्यातील जनतेवर झालेला अन्याय व त्यामधून झालेला उद्रेक यावर कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, ही भूमिका व्यक्तिगत नसून, ती जनतेच्या मागणीवरून घेतली,’’ असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोध करणाऱ्यांची कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षात हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला विरोध करणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, भरत शहा हे कोणती भूमिका घेतात, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अनेक प्रश्‍नांना ‘नो कॉमेंट्स’
देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून दुसरा प्रस्ताव काय होता? तसेच आता शांत झोप लागेल का? राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदाचे काय? असे प्रश्न विचारले असता, यावर हर्षवर्धन पाटील यांनी ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर देत बोलण्याचे टाळले. यापूर्वी पवारांबरोबर आपण नेहमीच राजकीय कुस्ती केली आता त्यांच्याबरोबर काम करायचे, याबाबत विचारले असता, ‘राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, तसेच पवार आणि पाटील या दोन घराण्यांचे गेल्या अनेक दशकापासून संबंध आहेत, ते टिकवावे लागतात,’ असे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली.

आमदार भरणे यांचा टोला
‘‘मला पूर्वी ही चांगली झोप लागत होती सध्याही चांगली झोप लागत आहे व भविष्यातील लागेल,’’ असा टोला आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाव न घेता लगावला. ते म्हणाले, ‘‘जो माणूस लोकांसाठी काम करतो, त्याला स्वतःचा आत्मविश्वास असतो. विरोधकांच्या प्रवेशावर घालमेल व्हायचा विषयच नाही.’’

‘पवारांचे तरी कसे होतील?’
हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाजपचे पदाधिकारी नवनाथ पडळकर यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘खोबरं तिकडं चांगभलं’, अशी राजकीय वाटचाल करणाऱ्या नेत्यांमुळे पक्षाचे काम कधीच थांबत नाही. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजपचे अस्तित्व कायम राहणार आहे. त्यांना ५ वर्षे शांत झोप मिळाली. जे व्यक्ती एवढे देणाऱ्याचे झाले नाहीत, ते शरद पवार यांचे आणि इंदापूरकरांचे तरी कसा होईल? असाही सवाल यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT