इंदापूर, ता. ९ : इंदापूर बस स्थानकातील समस्यांबाबत ‘सकाळ’ने मांडलेल्या भूमिकेची दखल घेण्यात आली असून, बस स्थानकावरील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ‘सकाळ’ने मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत याबाबत विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले होते. आता रस्त्यांच्या कामांना सुरवात झाल्याने इतरही समस्यांकडे एसटी प्रशासनाने लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
इंदापूर शहराच्या वैभवात भर घालणारे, अतिशय भव्य दिव्य बसस्थानकच सध्या इंदापूरच्या बदनामीला कारणीभूत होत आहे. कारण बसस्थानकाला समस्यांनी ग्रासले असून प्रवेशद्वारापासूनच सर्वत्र पडलेले खड्डे, स्थानकाच्या अंतर्गत आणि बाह्य भागात होत असलेली अवैद्य पार्किंग, परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि नियोजनाचा अभाव, तसेच स्थानकावर आसन व्यवस्थेसाठी बसवण्यात आलेल्या खुर्च्याही गायब झाल्या आहेत. स्थानकावर असलेले अनेक पंखेही बंदच असतात.
यामुळे इंदापूर बसस्थानक समस्यांचे आगार बनल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करीत त्याचा पाठपुरावा केला. त्याची दखल घेत बस स्थानकावरील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली. ‘सकाळ’ने लावून धरलेल्या या प्रश्नामुळे रस्ता दुरुस्त होत असल्याने प्रवासी वर्गातून ‘सकाळ’चे आभार व्यक्त होत आहेत.
इंदापूर शहरामध्ये पुणे-सोलापूर महामार्गालगत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या सूत्रानुसार भव्य असे बस स्थानक बांधण्यात आले. पुणे, सोलापूर, लातूर, उदगीरपासून कर्नाटक, हैदराबादकडे ये-जा करणाऱ्या एसटी बस येथे येत असतात. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बस स्थानक असल्याने लोकांची, प्रवाशांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून बस स्थानकात सुविधांची वाणवा आहे. याची सुरवात एसटी बस आता येणाऱ्या जाणाऱ्या प्रवेश मार्गावरच असलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य पासून होते. या प्रवेश मार्गावर मोठ मोठे खड्डे तर आहेतच शिवाय गटारीचे चेंबरही फुटले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.
बसस्थानकातील खुर्च्या चोरीला
प्रवासी उभा राहण्याच्या जागी स्थानकावरच थेट दुचाकी गाड्या उभ्या केल्या जात आहेत. तर बस स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या शेकडो लोखंडी खुर्च्याही चोरीला गेल्या आहेत. ना याच्याकडे इंदापूर आगाराचे लक्ष आहे. ना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे एवढ्या मोठ्या बसस्थानकावर प्रवाशांना मात्र जमिनीवरच बैठक मारावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.