इंदापूर, ता. ६ : ‘‘इंदापूर येथील शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने कोरोना कालावधीत १४ हजार कुटुंबांना सलग दोन वर्षे अन्नधान्य मोफत पुरवून व २२ गावांमध्ये वृक्षारोपण करून आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. यावेळी तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच महिला सफाई कामगारांना मोफत पैठणी देत आदर्श पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे स्वागत पत्रकार संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, स्वागत प्रमुख संतोष आटोळे,सचिव सागर शिंदे यांनी केले.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश शहा, उद्योजक वसंतराव मोहोळकर, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, दुय्यम निबंधक विनायक तपस्वी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, मुकुंद शहा, बाळासाहेब हरणावळ, रघुनाथ राऊत, शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, प्रा. कृष्णाजी ताटे, धरमचंद लोढा, सागर मिसाळ, डॉ.अनिल शिर्के यांच्यासह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
तालुक्याच्या विकासाचे भागीदार
पत्रकार संघाच्या वतीने शहा ग्लोबल स्कूलच्या रुचिरा अंगद शहा, जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे श्रीमंत ढोले यांना आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, श्री केतकेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग यांना आदर्श पतसंस्था पुरस्कार, शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दशरथ घोगरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार तर आदर्श युवा उद्योजक म्हणून जे.के.जगताप कंपनीचे विराज जगताप,आदर्श योग शिक्षक म्हणून दत्तात्रेय अनपट, आदर्श वैद्यकीय सेवा म्हणून डॉक्टर श्रेणिक शहा, आदर्श उद्योजक म्हणून सागर भोसले यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
07861
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.