पुणे

उजनीतून भीमा नदीत आजपासून विसर्ग

CD

इंदापूर, ता.१६ : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान असणाऱ्या उजनी धरणातून सोमवारी (ता.१७) रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सोलापूरसाठी वीज निर्मितीच्या माध्यमातून १६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येणार आहे.
नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण कक्षाचे वतीने देण्यात आली. यामुळे संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात न उतरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, याबाबत देण्यात आलेल्या आदेशानुसार ३० जानेवारी २०२५ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीचे बैठक संपन्न झाली यामध्ये झालेल्या निर्णयानुसार भीमा नदी काठच्या गावातील पिण्याचे पाणीपुरवठा योजनांसाठी सोमवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजल्यापासून धरण विद्युतगृहामधून सुरुवातीस १६०० क्यूसेस इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गामध्ये टप्याटप्यामध्ये वाढ करून ६ हजार क्यूसेक इतका करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षतेच्या दुष्टीने धरणाखालील भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना ससतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी याकामी पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसी आहे.सध्या धरणात एकूण पाणीसाठा ९८.०८ टीएमसी यामधील उपयुक्त पाणीसाठा ३४.४२ टीएमसी पाणीसाठा उजनी जलाशयांमध्ये उपलब्ध आहे.
-
धरणातील रविवारपर्यंतची स्थिती
एकूण पाणी पातळी.......४९५.०९०मीटर
एकूण पाणीसाठा.......२७७७.५६ घनमीटर (९८.०८ टीएमसी)
उपयुक्त जलसाठा.......९७४.७५ घनमीटर
(३४.४२ टीएमसी).......६४.२५ टक्के

08252, 08250

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

SCROLL FOR NEXT