पुणे

कृषी प्रदर्शने शेतकऱ्यांसाठी वरदान

CD

इंदापूर, ता.१६ : शेतीमधील नवनवीन पद्धती आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी कृषी प्रदर्शने तालुकास्तरावर व्हावीत यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आमचा प्रयत्न होता. राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीत कृषिक सारखा मोठा उपक्रम होतो. त्याच पार्श्वभूमीवर होत असलेला इंदापूर येथील शरद कृषी महोत्सव त्याचेच प्रतीक असून, कृषी प्रदर्शने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
इंदापूर येथे शरद कृषी महोत्सवास सुळे यांनी भेट दिली. यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते तसेच विविध स्पर्धांची बक्षीस वितरणही करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, किसन जावळे, रेशमा शेख, अमोल मुळे, दत्तात्रेय तोरसकर, संजय शिंदे, समद सय्यद, देविदास भोंग, श्रीकांत मखरे, मयूर शिंदे, अक्षय कोकाटे यांचेसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, खासदार सुळे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकांविषयी आणि कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली.

यावेळी महारुद्र पाटील यांनी प्रास्ताविक तर अमोल भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. सागर मिसाळ यांनी आभार मानले. संतोष नरुटे व रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले

महोत्सवात लाखोंची आर्थिक उलाढाल
शरद कृषी महोत्सवाच्या आयोजक महारुद्र पाटील म्हणाले की, प्रदर्शनाच्या कालखंडात तब्बल ७५ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठीच्या चर्चासत्रांच्या माध्यमातून ऊस शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) वापराबाबतचे तंत्रज्ञान, पशुपालकांसाठी गाईंचा भाकडपणाचा काळ कमी करणे आणि केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती देण्यात आली. या बरोबरच शंभरहून अधिक लागलेल्या स्टॉलच्या माध्यमातून लाखोंची आर्थिक उलाढाल झाली.
-
इंदापूर : आयोजित शरद कृषी महोत्सवानिमित्त कृषी प्रदर्शनास भेट प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे,महारुद्र पाटील व इतर मान्यवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT