इंदापूर, ता. १९ : शहरातील सरस्वती नगर येथे दोन गटांत झालेल्या मारामारी प्रकरणी इंदापूर पोलिस ठाणे येथे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याचे हवालदार नामदेव प्रकाश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील सरस्वतीनगर येथे मंगळवारी (ता. १८) रात्री दोन गटात एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन मारामारी करीत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अजिंक्य सुरेश जावीर (रा. सरस्वतीनगर, ता. इंदापूर), अक्षय आडसूळ, पिंटू ढावरे, संजय पारसे (तिघेही रा. साठेनगर, इंदापूर), ईसाक शेख, भैय्या शेख, निसार शेख, पिंटू यादव (सर्व रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार कळसाईत यांनी सरस्वतीनगर भागात दोन गटात भांडणे चालू असल्याचे सांगितल्यानंतर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पाच ते सहा पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या ठिकाणी गर्दीतले लोक पोलिसांसमोर देखील एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन मारामारी करीत होते. यामध्ये वरील आठ जण असल्याचे समजले, तर काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. या मारामारीमध्ये एक चार चाकी (क्र. एम.एच.४२ बी.पी.३३३०), तर एक दुचाकी (क्र. एम.एच.४२ एक्स.८८३९) ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.