पुणे

ऊस शेती क्षेत्रात ‘ए आय’चा वापर क्रांतिकारक

CD

इंदापूर, ता. १० ः ‘‘ऊस शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय) या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे ४० टक्केपर्यंत उत्पादन वाढ होते. त्याचबरोबर साखरेच्या उताऱ्यातही वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस शेती क्षेत्रात (ए. आय) चा वापर क्रांतिकारक ठरेल,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना यांचे संचालक, शेतकरी व अधिकारी यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यात त्यांनी मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने (ए. आय) तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेतीची माहिती घेतली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भातील वार रूमला भेट दिली.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश नलवडे यांनी आर्टिफिशियल पद्धतीने केलेल्या ऊस शेतीची माहिती देताना ऊस शेतीमधील क्रांतिकारक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवा. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत हे तंत्रज्ञान पोहचविले जात आहे. या पद्धतीने उसाचे एकरी १५० टन एवढे उत्पादन घेतले आहे. आता एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे म्हणाले, ‘‘राज्यात (ए. आय) तंत्रज्ञानाने सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले आहे. या तंत्रज्ञान वापरासाठी शेतकऱ्यांना दोन एकरासाठी १२ हजार ५०० एवढा कमी खर्च येत आहे.’’

यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे तुषार जाधव, धीरज शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT