पुणे

सोनेरी गवताची ‘कुरण सफारी’साठी निसर्गप्रेमींना पर्वणी

CD

समीर बनकर : सकाळ वृत्तसेवा
शिर्सुफळ, ता. १२ : बारामतीहून कटफळ-मुरूम मार्गाने शिर्सुफळकडे जाता तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला हिरव्या-सोनेरी गवताचा सागर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. पावसाळ्यात हिरवे, हिवाळ्यात तपकिरी आणि उन्हाळ्यात पिवळे-सोनेरी होणारे हे गवताळ माळरान आता पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. ‘कुरण सफारी’साठी राज्यभरातील निसर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध होत आहे.
बारामती तालुक्यातील केवळ शिर्सुफळच नव्हे, तर गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, पणदरे, सोनकसवाडी, मुढाळे, म्हसोबावाडी, कटफळ, उंडवडी कडेपठार, कारखेल, दंडवाडी, सोनवडी सुपे, नारोळी, कोरोळी, खराडवाडी, उंडवडी सुपे हा परिसरात गवत कुरणाने व्यापला आहे.
हा भाग जैववैज्ञानिकदृष्ट्या ‘सवाना’ प्रकारच्या काटेरी वनात मोडतो.

२,५०० हेक्टर.............. २० ठिकाणी गवती कुरण

या गवतांच्या प्रजातींचा विस्तार
मारवेल
शेडा
डोंगरी गवत
सफेद कुसळी
काळी कुसळी
घाट्या, दीनानाथ
भालेगवत, गोधडी


गवताळ परिसरात यांचा मुक्त वावर
चिंकारा
ससा
लांडगा
कोल्हा
साळींदर, तरस
सरपटणारे प्राणी आणि कीटक मुक्तपणे फिरताना दिसतात.

गवताच्या उंच काड्यांमध्ये पक्ष्यांचे साम्राज्य
तुरेबाज चंडाल,
तितर, डोंबारी चिमणी,
माळमुनिया, भारतीय चंडोल,
धाविक, खडकी लावा,
हिवाळी गप्पीदास, शेतपिपीट,
पाखरुडी, विविध टिटव्या आणि चतुर


गवताचे  फायदे.....
- जमिनीची धूप थांबवते, मातीची सुपीकता टिकवते.
- दाट जाळ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते; भूजलपातळी वाढते.
- पक्ष्यांना घरट्याची उत्तम सामग्री मिळते
(विशेषतः सुगरण, तुरेबाज चंडाल व चिमण्या)
- फुलपाखरे, मधमाश्या, सरपटणारे प्राणी यांना नैसर्गिक आश्रय.
- अनेक औषधी वनस्पती (दूर्वा, नागरमोथा, बेहडा इत्यादी)


उन्हाळ्यात दरवर्षी शेकडो हेक्टर गवत जळून खाक होते. यंदा आम्ही नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये सर्व गवताळ क्षेत्रात १०-१५ मीटर रुंद ‘वनवा संरक्षण पट्टे’  काढत आहोत. शाळा-महाविद्यालये, ग्रामपंचायत, युवक मंडळे यांच्याबरोबर जनजागृती मोहीम राबवत आहोत. याशिवाय परदेशी झाडे उपटून मूळ गवतालाच प्राधान्य देण्याचे धोरण राबवत आहोत.
- अश्विनी शिंदे, बारामती वन परिक्षेत्र अधिकारी

जर हे गवताळ माळरान टिकले तर पुढील दहा वर्षांत बारामती
परिसरात चिंकारांची संख्या जास्तीत जास्त होईल. पक्ष्यांच्या अधिक अधिक प्रजाती येथे नियमित येऊ लागतील. पण जर परदेशी झाडे लावत राहिलो तर ही मिनी सवाना पुन्हा काटेरी जंगलात बदलून वन्यजीव गायब होतील. वनविभागाने परदेशी झाडांचे रोपण पूर्णपणे बंद करावे आणि स्थानिक गवतांचे बियाणे पेरण मोहिम हाती घ्यावी.
- डॉ. महेश गायकवाड, प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक


महाराष्ट्राची ‘मिनी सवाना सफारी’
शिर्सुफळ आणि परिसरातील गवताळ मैदाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ‘मिनी सवाना सफारी’ बनली आहेत. सकाळी-सायंकाळी येथे फिरायला गेल्यास चिंकारांचे कळप, माग काढणारे लांडगे, कोल्हे, आकाशात चक्कर मारणारे गरुड आणि गवतात लपलेले तुरेबाज चंडाल यांचे दर्शन हमखास होते. फक्त हे सौंदर्य आणि जैवविविधता टिकवण्यासाठी बारामतीकरांनी फक्त एक गोष्ट करायची आहे, गवत जळू देऊ नका, परदेशी झाडे लावू देऊ नका.
कारण गवत हा केवळ चारा नाही, तो बारामतीच्या माळरानाचा जीव आहे, असे आवाहन वन विभागाचे वनपाल संतोष उंडे यांच्यासह पर्यावरण प्रेमी व अभ्यासकांनी केले आहे.


76483, 76484, 76485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT