पुणे

सोमेश्वरनगर

CD

सोमेश्वरनगर, ता. २४ : मुरूम (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे सरपंच संजयकुमार शिंगटे यांनी गायरान जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत बारामती महसूल विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
शिंगटे हे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच झाले. ग्रामपंचायत सदस्य प्रशील जगताप व संकेत जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करत गायरान जागेवर अतिक्रमण केले असून, निवडणुकीवेळी नमूद केले नसल्याने शिंगटे यांना अपात्र करावे, असा तक्रार अर्ज दाखल केला आहे. शिंगटे यांनी गायरान गट क्रमांक ३८ मधील ६० गुंठे क्षेत्रात २००६ पासूनच अतिक्रमण केले असून, यामध्ये वीटभट्टी, पाण्याची टाकी, पत्र्याच्या पाच खोल्या, वीटांसाठीची माती आहे. तसेच, गायरान गट १२७ मध्येही शिंगटे यांचे वडील नामदेव शिंगटे यांचे अतिक्रमण असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. यासाठी ‘एक-ई’ उताऱ्यातील संजय शिंगटे यांच्या नावे अतिक्रमणाची असलेली नोंद, ग्रामपंचायतीची अतिक्रमधारकांची यादी, वीटभट्टीतून वीटविक्री केलेल्या पावत्या, छायाचित्रे पुष्टीसाठी जोडली आहेत.
याबाबत तलाठी, मंडल अधिकारी यांनी पंचनामे करून अहवाल सादर केलेले आहेत.

मी गायरानाची कधी मागणी केली नाही, अथवा मला कधी नोटीसही नाही. तक्रारीमधील वीटभट्टी गायरानात नसून, लगतच्या गट क्रमांक ३९ मध्ये सुमन नामदेव शिंगटे यांच्या नावे आहे. संबंधित खोल्याही गरिबांच्या आहेत. वडिलांच्या नावचे गट क्रमांक १२७ लगतचे क्षेत्र त्यांनी विकलेले आहे. माझे व आईवडिलांचे रेशन कार्ड वेगळे असून, आम्ही विभक्त आहोत. उलट सर्व गायरान गटांचे चाळीस हजार रुपये भरून आम्ही सरकारी मोजणी मागविली आहे. मोजणी झाल्यानंतर ज्यांना जमीन आहे अशांची घरे व अतिक्रमणे जमीनदोस्त करणार आहोत. तसेच, गावठाण मोजून त्याच्या रस्त्यांमध्ये येणारी अतिक्रमणेही काढणार आहोत. तसा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यामुळे संबंधितांनी माझ्याविरुद्ध राजकीय व्देषापोटी तक्रारी केल्या आहेत.
- संजय शिंगटे, सरपंच, मुरूम (ता. बारामती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT