पुणे

कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे पीकही मातीमोल

CD

सोमेश्वरनगर, ता. १६ : कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सध्या टोमॅटोच्या पंचवीस किलोच्या क्रेटला अवघे शंभर रुपये मिळत आहेत. टोमॅटोच्या तोडणीचे आणि वाहतुकीचे भाडेसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी लाखो खर्चून कष्टाने उभे केलेले फड आता सोडून द्यायला सुरवात केली आहे. सोडलेले हे लालभडक फड पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत आहेत.
पुणे व सातारा जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, आंबेगाव, बारामती, पुरंदर तालुक्यांत टोमॅटोचे आगर मानले जाते. मागील वर्षी पाचशे ते पंधराशे रुपये क्रेटप्रमाणे शेतकऱ्यांना घसघशीत दर मिळाला. यावर्षी मागील आठवडाभर टोमॅटोला पंचवीस किलोच्या क्रेटला शेताच्या बांधावर ५० ते ६० रुपये आणि बाजार समितीत १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. मंगळवारी पुणे बाजार समितीत ५०० ते १५०० आणि सोलापूर बाजार समितीत २०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे अत्यंत निचांकी दर मिळाले.
चाळीस डिग्री तापमानात टोमॅटो जपण्यासाठी शेतकरी कसरत करत आहेत. पाणी, खते, औषधे यांचा खर्च वाढला असून, एकरी एक लाखापर्यंत भांडवल गुंतले आहे. रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. अशात परताव्याची बाब दूरची, पण तोडणी आणि वाहतुकीचे भाडेही निघेना. काहीजण उद्याच्या आशेवर तोडणी करत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी वैतागून फडच सोडून दिले आहेत.
हनुमंत जगताप म्हणाले, ‘‘सोमवारी १६ क्रेट बाजारात पाठविले. त्याचे वाहतूक भाडे ११०० रुपये झाले आणि पट्टी ६०० रुपयांची आली. रोगाने उत्पन्न घटलेय.’’ रोहिदास जगताप म्हणाले, ‘‘बाजारात घेऊन जाताना व्यापाऱ्याने शंभर रुपये क्रेट दर ठरविला आणि पैसे देताना नव्वद रुपयांनी दिले. निंबूत (ता. बारामती) येथील राजकुमार बनसोडे म्हणाले, ‘‘तीन एकर टोमॅटो केलाय. त्यापैकी निम्मा फड सोडून दिला. निम्माच तोडून पाठवतोय.’’

टोमॅटोने शेतकऱ्यांना पूर्ण मातीत घातले आहे. बांधावर पन्नास-साठ रुपये क्रेट म्हणजे दोन रुपये किलोने टोमॅटो विकत आहोत. इंडम टोमॅटो खपतोय, तरी पण साधा टोमॅटो व्यापारी घेतच नाहीत. लालसर टोमॅटोही घेत नाहीत. एकराला लाखाच्या पुढे खर्च येतोय. मी तर फडच सोडून दिलाय. काहीजण काढून टाकायच्या विचारात आहेत.
- उमेश जगताप, वाणेवाडी (ता. बारामती)


पणन महामंडळानुसार टोमॅटोचे भाव
बाजार समिती आवक (क्विं.) दर ( रू. प्रतिक्विंटल)
पुणे - २२३० ५०० ते १५००
मुंबई - १९२९ १००० ते १२००
सोलापूर - ४२९ २०० ते १०००
कोल्हापूर - २३७ ५०० ते १२००
संगमनेर- ६९०० २५० ते ८५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT