पुणे

मत गायकवाडांनाच, पण कोणत्या?

CD

सोमेश्वरनगर, ता. ३ : करंजेपूल (ता. बारामती) ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी पंचरंगी लढत लागली असून, एकाच गायकवाड भावकीतल्या पाच मैत्रिणींमध्ये रंगतदार लढत होत आहे. मतदारांनी ‘आमचं मत गायकवाडांनाच’ अशी गमतीदार पण पक्की राजकीय भूमिका घेतल्याने नेतेमंडळींची मात्र धाकधूक वाढली आहे. सरपंचपदाचा उमेदवार नसलेला शेंडकरवाडी प्रभाग ‘किंगमेकर’ ठरणार आहे.
करंजेपूलला सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने पूजा वैभव गायकवाड, नम्रता सागर गायकवाड, आरती राजेंद्र गायकवाड, सोनाली सतीश गायकवाड, कोमल सूर्यकांत गायकवाड या एकाच भावकीतल्या पाच समवयस्क मैत्रिणींमध्ये चुरशीची लढत होत आहे. प्रचारही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात असल्याने मतदारांमध्येही समाधान आहे. कुणाला मत देणार? कोण निवडून येणार? लक्ष आहे का? अशा प्रश्नांवर मतदारांनी, ‘आमचं मत गायकवाडांनाच आणि गायकवाडच निवडून येणार’ अशी गमतीदार भूमिका घेतली आहे. राजकीयदृष्ट्या मोठे गाव असल्याने पोलिसांनीही आज आवर्जून पथसंचलन करत करडी नजर ठेवली आहे.
सदस्यपदासाठी प्रभाग एकमधील एका जागेसाठी सुहास गायकवाड, अप्पासाहेब गायकवाड व सूर्यकांत गायकवाड यांच्यात लढत होत आहे. प्रभाग दोनमध्ये रेश्मा गायकवाड व शैलजा गायकवाड यांच्यात सरळ लढत होत आहे. तसेच, प्रवीण गायकवाड व संभाजी गायकवाड विरुद्ध प्रणय गायकवाड व संदीप लकडे यांच्या लढतीत अपक्ष उमेदवार सूर्यकांत गायकवाड व सुधीर गायकवाड यांनी रंग भरले आहेत. प्रभाग तीनमध्ये निखिल शेंडकर विरुद्ध मयूर शेंडकर आणि कविता शेंडकर विरुद्ध अरुणा शेंडकर, असा सरळ सामना आहे. प्रभाग चारमध्ये कोमल गायकवाड, सीमा गायकवाड यांच्या विरुद्ध शैलजा गायकवाड यांचे आव्हान आहे; तर सचिन लकडे आणि संदीप लकडे यांच्यात थेट सामना होत आहे.

पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा सन्मान
शेंडकरवाडी प्रभागात पंचवीस वर्ष पाणीपुरवठ्याचे प्रामाणिक काम करणारे सूर्यकांत गायकवाड यांच्या सूनबाई सोनाली गायकवाड यांना ग्रामस्थांनी आवर्जून बिनविरोध निवडून देत खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान केला. तसेच, मागील निवडणुकीतील सरपंचपदाचे पराभूत उमेदवार बबन पवार यांची कन्या प्रज्ञा भिंगारे यांनाही आवर्जून बिनविरोध निवडून दिले. ग्रामस्थांच्या या दोन्ही कृतींचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT