पुणे

निंबूतमधील पतसंस्थेत सव्वा कोटींचा अपहार

CD

सोमेश्वरनगर, ता. ३ : निंबूत (ता. बारामती) येथील गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार आढळून आला आहे. याप्रकरणी संस्था सचिव सतीश वसंतराव काकडे व लेखनिक नीलेश नरहरी कुलकर्णी (दोघेही रा. नीरा, ता. पुरंदर) या दोघांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबूतचा नोंदणीकृत पत्ता असलेल्या परंतु नीरा येथे कार्यालय असलेल्या गणेश पतसंस्थेचे राहुल विलासराव काकडे हे संस्थापक-अध्यक्ष आहेत. या संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची गेली दोन वर्षे चर्चा सुरू होती. याप्रकरणी सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण के. डी. मोरे व सहकाऱ्यांनी केले. यामध्ये १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १ कोटी २२ लाख २९ हजार ८०५ रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. मोरे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सभासदांनी पतसंस्थेमध्ये जमा केलेल्या रकमेचा सतीश काकडे व नीलेश कुलकर्णी यांनी पदाचा दुरुपयोग करत गैरव्यवहार केला आहे. संस्थेच्या नीरा येथील पुणे जिल्हा बँकेच्या व बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात रकमा भरल्या नाहीत. उलट संस्थेच्या दफ्तरी दिशाभूल करणारे खोटे व्यवहार जाणीवपूर्वक नोंदवून सभासदांचा विश्वासघात स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. साबळे हे तपास करत आहेत. दरम्यान, ठेवीदारांना आपल्या रकमा परत मिळण्याबाबत कार्यवाही कधी होणार याची प्रतिक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

SCROLL FOR NEXT