पुणे

दूध दरावरून असंतोषाची उकळी

CD

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २९ : सांगली- कोल्हापूर पट्ट्यातील दूध संस्थांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये घट केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह अन्यत्रही दूध दर घटतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील काही दूध प्रक्रिया उद्योग दर घटविण्याबाबत चाचपणीही करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा रोष टाळण्यासाठी सध्या दर घटवला जाणार नाही. या पार्श्वभूमीवर दूध दरातील चढ- उतार टाळण्यासाठी समान पायाभूत दर निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मतदान प्रक्रिया पार पडताच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संघांनी एकत्र येत दूध दरात प्रतिलिटर तीन रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संघांकडून आधीच शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३३ रुपये दर दिला जात होता. आता तो प्रतिलिटर ३० रुपये दिला जाणार आहे. शिवाय सरकारी अनुदान प्रतिलिटर सात रुपये मिळणार आहे.
दरम्यान, पुणे, अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यासह अन्यत्र आधीपासूनच प्रतिलिटर २७ ते २८ रुपये प्रतिलिटर, असा दर दिला जात असून, अनुदानासह तो दर ३४ ते ३५ रुपये प्रतिलिटर आहे. तरीही दुग्धजन्य पदार्थांचे दर पुरेसे नसल्याचे कारण पुढे करत बडे दूध प्रक्रिया प्रकल्प २८ रुपये दरात घट करण्यासाठी चाचपणी करत होते. शेतकऱ्यांनाही याचे भय वाटत आहे. आधीच उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध धंदा गोत्यात गेलेला असताना दरात आणखी घट शेतकऱ्यांना काडीमात्र परवडणार नाही. यामुळे तीव्र रोष निर्माण होणार आहे.

मधली साखळीच गब्बर
सध्या तरी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळा दूध खरेदी दर आहे. शेतकऱ्यांकडून स्वस्तात दूध खरेदी करून पुढे वितरकास स्वस्तात देण्याची स्पर्धा बोकाळली असून, मधली साखळीच गब्बर होत आहे. या स्पर्धेमुळेच कोल्हापूर, सांगलीच्या दूध संघांना दर घटवावा लागला. याबाबत नव्या राज्य सरकारने हस्तक्षेप करत राज्यभरात समान दर करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा दूध पावडरचे दर पुरेसे असतानाही केवळ स्पर्धेमुळे दर घटण्याचा धोका आहे.

सरकारचे अनुदान मिळविणे जाचक असून, तेही दोन महिन्यांचे थकले आहे. चारा, औषधे, पशुखाद्य असे दर वाढल्याने २८ रुपये लिटरने दूध धंदा अजिबात परवडत नाही. अशात दर घटविले तर गोठेच्या गोठे मोकळे होतील. उलट प्रतिलिटर ३५ रुपये पायाभूत दर करावा आणि त्यावर अनुदान द्यावे.
- संतोष दरेकर, दूध उत्पादक

कोल्हापूरच्या दूध संघांनी तीस रुपये प्रतिलिटर दर केला आहे. इथले दर मात्र २८ रुपये प्रतिलिटरवरच टिकून आहेत. त्यामध्ये कुठलीही घट केली जाणार नाही. सरकारी अनुदान प्रतिलिटर ७ रुपये गृहित धरून शेतकऱ्यांना ३५ रुपये प्रतिलिटर दर मिळत राहील.
- प्रकाश कुतवळ, सचिव, राज्य दूध उत्पादक, प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT