सोमेश्वरनगर, ता. १८ : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी वाघळवाडी (ता. बारामती) येथील अॅड. अनंत सकुंडे यांच्यावर मारहाणीचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिसांत दाखल केला आहे.
याबाबत संतोष ज्ञानदेव भिसे (वय ४३, रा. मुरूम ता. बारामती) या ट्रॅक्टरचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाघळवाडी ते सोमेश्वर कारखाना रस्त्यावर सकुंडे यांनी चारचाकी वाहनास वाट मोकळी करून न दिल्याच्या रागातून ऊसवाहतूक करणारा ट्रॅक्टरचालक मल्हारी भंडलकर (रा. मुर्टी, ता. बारामती) यांना दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण करून जबर दुखापत केली. याबाबत संतोष भिसे समजवण्यासाठी गेले असता त्यांनाही जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सोमनाथ राजेंद्र राणे व लक्ष्मण मोहन कांबळे या चालकांनाही उसाच्या वाढ्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मल्हारी भंडलकर यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी अॅड. सकुंडे यांना बारामती न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.