पुणे

निर्यात शुल्क हटवूनही बाजारभाव जैसे थेच

CD

सोमेश्वरनगर, ता. २५ : कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटविण्यास केंद्रसरकारने नको तितका विलंब केला. परिणामी निर्णय होऊनही कांद्याच्या बाजारावर काडीमात्र फरक पडला नाही. निर्णयाआधी पुणे व लोणंद बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल होते ते आजही जैसे थे च आहेत. कांद्याची आवक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठाव मात्र मिळणार आहे.
केंद्रसरकारने मे २०२४ मध्ये निर्यातबंदी शिथिल करत चाळीस टक्के निर्यातशुल्क लावले. सप्टेंबर २४ मध्ये निर्यातशुल्क वीस टक्क्यांवर आणले. दिवाळीनंतर खरीप कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येऊ लागल्यावर कांद्याच्या भावात घसरण झाली. त्यावेळीच निर्यातशुल्क शून्यावर आणणे आवश्यक होते. खरीप कांदा संपून रब्बी कांदा बाजारात येऊ लागल्यावरही निर्यातशुल्क जैसे थे ठेवले गेले. यानंतरही जानेवारी, फेब्रुवारीत कांद्याचे भाव बरे राहिल्याने शेतकऱ्यांमधून संताप उसळला नव्हता. मात्र कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरवातीला प्रतिक्विंटल ३००० रुपये असलेला कांदा फेब्रुवारीच्याखेरीस प्रतिक्विंटल २६०० रुपये झाला. मार्चमध्ये तर तब्बल दीड हजार रुपयांनी दर कोसळले. मात्र तरीही केंद्रसरकारला पाझर फुटला नाही.

भारतीय कांद्याच्या मागणीबाबत चिंता
अखेर २२ मार्चला निर्यातशुल्क शून्यावर आणले. मात्र आता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या सर्व कांदा उत्पादक राज्यात उत्पादन चांगले झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्याने भारतीय कांद्याला परदेशातून कितपत मागणी राहते याबद्दल चिंता आहे. या वातावरणामुळे २० मार्चला पुणे बाजार समितीत कांद्याला ७०० ते १७०० रुपये आणि लोणंद बाजार समितीत ८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असे मिळालेले दर आज काडीमात्र वाढले नाहीत.

निर्यातीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस १ एप्रिल उजाडेल. शिवाय सध्या नाशिक, नगर, पुणे मधून कांद्याच्या आवकेचा जोर जास्त आहे. राजस्थान चालू होईल. मध्यप्रदेशातून पुढील महिन्यात अधिकाधिक आवक येईल, अशी चिन्हे आहेत. ईदनिमित्तची मागणीही कमी झाली आहे.
- बिपिन शहा, कांदा निर्यातदार

सरकारला आयात-निर्यातीच्या धोरणाचा खेळखंडोबा करायचा असेल तर करावा. मात्र पंचवीस रुपये किलोपेक्षा दर घटले की दुधाप्रमाणे प्रतिकिलो पाच रुपये अनुदान द्यावे. पंधरा ते सतरा रुपये दराने भांडवलही निघत नाही.
- भगवान पिंगळे, कांदा उत्पादक

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळालेले बाजारभाव
दिनांक दर प्रतिक्विंटल

६ मार्च.............८०० ते २४००
१३ मार्च............. ८०० ते १६७०
२० मार्च.............८०० ते १७००
२४ मार्च.............८०० ते १७५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT