पुणे

वाणेवाडीत शेतांना तळ्याचे स्वरूप

CD

सोमेश्वरनगर, ता. २५ : बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतांना तलावाचे स्वरूप आले असून ओढे, नाले, चाऱ्या पावसाळ्यासारखे दुथडी भरून वाहू लागले आहेत. यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील पालेभाज्या, फळभाज्या अशी तरकारी पिके अक्षरशः नष्ट झाली आहेत. वाणेवाडीत शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
होळमधील आघारकर कृषी संशोधन केंद्रावर तब्बल २८१ मिलिमीटर इतक्या अठ्ठावन्न वर्षातल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पिकाचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.


बारामतीत आज (ता. २५) सकाळी आठ वाजता अठ्ठेचाळीस तासात १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत मे मध्ये एकूण २८१ मिमी पाऊस नोंदला तो ३०० पेक्षा अधिक होणारच आहे. सोमेश्वर मंदिराजवळील मोठा तलाव निम्मा भरला आहे. तो भरण्याआधीच करंजे ओढ्यातून मोठा प्रवाह वाहतो आहे. शेंडकरवाडी-कर्चेवाडी मार्गाने जाणाऱ्या ओढ्याला प्रचंड पूर आल्याने सोरटेवाडी व कर्चेवाडीमधील काही घरे पाण्याखाली गेली होती. सस्तेवाडी ओढ्याचे पाणी नीरा-बारामती महामार्गावरून वहात होते. या ओढ्यांचे पाण्याने नीरा नदीही जोरदार वाहू लागली होती. दरम्यान, शेंडकरवाडी येथे दोन तलावांची कामे करताना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याच्या जागा नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, परिसरातील टोमॅटो, वांगी, कारली, दोडका, काकडी अशा प्रमुख फळभाज्या आणि कोथींबीर, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, मिरची आदी पालेभाज्या जवळपास संपल्यात जमा आहेत. शेताची अक्षरशः तळी झाली आहेत.

अतिवृष्टीमुळे सर्व पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोपटराव बेलपत्रे, शिवाजी शेंडकर, शशिकांत जेधे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

आघारकर संशोधन केंद्राच्या नोंदी
तारीख पाऊस (एमएम)
२२ मे ९०
२३ मे २४
२४ मे ७०.५
२५ मे ८०.८
04585

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT