पुणे

उपस्थितीच्या दोनच सह्या ऑफलाइन घ्या

CD

सोमेश्वरनगर, ता. ११ ः वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठीच्या प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक शिक्षकांची दररोज चक्क सहा वेळा हजेरी घेण्याचा अजब प्रकार सुरू आहे. प्रत्येक तासिकेनंतर सर्व उपस्थितांच्या सह्या घेऊन तातडीने अपलोड कराव्या लागत आहेत. यादरम्यान तांत्रिक अथवा वैयक्तिक कारणास्तव एका दिवसाची एक सही जरी राहिली तरी शिक्षक प्रक्रियेमधून आउट होत आहे. यामुळे प्रशिक्षण घेऊनही संबंधित शिक्षक तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षणातून बाद ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे उपस्थितीच्या दोनच सह्या ऑफलाइन घेण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे.
राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यभरातील वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीस पात्र ठरलेल्या शिक्षकांचे तालुकानिहाय २ ते १२ जून कालावधीत प्रशिक्षण सुरू केले आहे. दिवसभरात ९० मिनिटांच्या चार ते पाच तासिका होतात. दर तासिकेनंतर शिक्षकांचे ऑनलाइन मूल्यमापन करण्याचा एससीईआरटीने फतवा काढला होता. मात्र, त्याचा ऑनलाइनचा फज्जा उडाला आणि तो निर्णय मागे घेतला गेला.
शिक्षकांना प्रशिक्षणादरम्यान दररोज प्रवेशावेळी एक आणि पाच तासिकेनंतर पाच सह्या अशा एकूण हजेरीच्या सहा सह्या द्याव्या लागत आहेत. पुन्हा हजेरीची पीडीएफ फाइल तातडीने ऑनलाइन अपलोड करण्याचे अवघड काम केंद्र समन्वयकास करावे लागत आहे. यादरम्यान एखाद्याची काही कारणास्तव सही राहिल्यास सिस्टममधून त्याचे नाव कायमचे डिलीट होत आहे. अनेक शिक्षकांवर तशी कुऱ्हाड कोसळली आहे. २ तारखेपासून प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकाचे १२ तारखेला शेवटच्या दिवशी जरी एखादी सही चुकली तरी तो पूर्ण प्रशिक्षणातून बाद होणार आहे.

जुन्नर तालुक्यातील एक प्रशिक्षणार्थी म्हणाले, ‘‘तासिका संपली की १० मिनिटांत ३० ते ६० सह्या गोळा करून अपलोड करताना कुणीतरी अनवधानाने मागे राहते आहे. सरकारच्या अनेक तांत्रिक चुका शिक्षक सहन करतात. आमची एक चूक समजून घेतली जात नाही, याची खंत वाटते.’’

प्रशिक्षण आनंददायी करायचे की शिक्षा द्यायची हेच कळेना. दिवसभरात सहा सह्या म्हणजे एससीईआरटीने स्वतःच्याच डायट, पर्यवेक्षीय यंत्रणेवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार आहे. त्याऐवजी दिवसाची सुरुवात आणि समारोप अशा दोनच सह्या ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. प्रशिक्षणास हजर असणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र मिळावे.
-बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

एससीईआरटीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यभर नियमन करत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात ११४ बॅच सुरू आहेत. मोठ्या संख्येमुळे प्रत्येकाच्या हजेरीवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. एससीईआरटी प्रशिक्षणाचे नियमन करत असून, प्रत्येक सही आवश्यक आहे. एकदा सही राहिली तरी प्रक्रियेतून नाव बाजूला होत आहे.
- नामदेव शेंडकर, प्राचार्य, पुणे जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT