पुणे

मैदानी स्पर्धेत सोरटेवाडीची सृष्टी नरळे तृतीय

CD

सोमेश्‍वरनगर, ता. २५ : पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या मैदानी स्पर्धेत आपापल्या गटात सिद्धी संजय शिंदे हिने द्वितीय तर सृष्टी हरिबा नरळे हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
पुणे येथील बालेवाडी क्रीडांगण येथे नुकत्याच जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडला. यामध्ये सोरटेवाडी (ता. बारामती) येथील माध्यमिक विद्यालय करंजेची विद्यार्थिनी सृष्टी नरळे हिने ६०० मीटर धावणे या प्रकारात १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला. तसेच उत्कर्ष आश्रमशाळेची विद्यार्थिनी सिद्धी शिंदे हिने १६ वर्षाखालील मुलींच्या गटात ८०० मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.
दोघींचीही विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही धावपटूंना निवृत्त रेल्वे पोलिस उपनिरीक्षक अंकुश दोडमिसे यांनी मार्गदर्शन केले. सोरटेवाडीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लकडे, उत्कर्ष आश्रमशाळेचे अध्यक्ष अजिंक्य तावरे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT