पुणे

शिष्यवृत्तीचा ‘शिरूर पॅटर्न’ अव्वल

CD

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता.२ : पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २८.४२ टक्के विद्यार्थी पात्र (उत्तीर्ण) झाले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा शिष्यवृत्तीचा ‘शिरूर पॅटर्न’ जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ खेड, आंबेगाव तालुक्यांनीही समाधानकारक यश मिळविले आहे.
निकालाच्या पात्र टक्केवारीत भोर अग्रभागी आहे. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली हे भौतिक ‘प्रगत’ मानले जाणारे तालुके शैक्षणिक गुणवत्तेत ‘मागास’ ठरले आहेत. हवेली, जुन्नर तालुक्यांनाही आत्मपरिक्षण करावे लागणार आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात १७५३ शाळांमधील ३६ हजार ६९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ११३७ गैरहजर विद्यार्थी वगळता १० हजार ४३१ विद्यार्थी पात्र तर २५ हजार १३१ विद्यार्थी अपात्र ठरले.
शिरूरने पुन्हा तब्बल तीनशेपेक्षा अधिक शिष्यवृत्तीधारक घडविले आहेत. खेड व आंबेगावने आपले सातत्य राखले आहे. गुरुकुल विद्यामंदिर (२७ विद्यार्ती) या एकट्या शाळेच्या जिवावर इंदापूरने चौथे स्थान पटकावले आहे. मात्र, अन्य १२६ शाळांमधून फक्त २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले हे वास्तव आहे. पुरंदर आणि मावळ तालुक्याने आधीच्या कामगिरीच्या तुलनेत थोडी प्रगती केली आहे. बारामती, हवेली, जुन्नर या बड्या तालुक्यांना अजूनही गुणवत्तेचे डोहाळे लागत नसल्याचे निकालावरून स्पष्ट दिसत आहे. दौंड, मुळशी तालुक्यांमध्ये शिष्यवृत्तीधारकही नाहीत आणि निकालातही पिछेहाट झाली आहे. शिरूर तालुक्यातील एकेक शाळा पूर्ण बारामती, हवेलीला भारी ठरली आहे. दहा तालुक्यांना मिळून जे यश गाठता आले नाही ते शिरूरने मिळविल्याने त्यांना ‘शिरूर पॅटर्न’ समजून घ्यावा लागणार आहे.


मुळशी, हवेली, दौंडमध्ये चिंताजनक स्थिती
शिष्यवृत्तीधारकांसोबत उत्तीर्ण किती हेही महत्त्वाचे मानले जाते. भोर व राजगड हे दुर्गम तालुके शिष्यवृत्तीधारकांत मागे असले उत्तीर्णांच्या टक्केवारीत समाधानकारक कामगिरी बजावली आहे. यात आंबेगाव, मावळ, खेड जिल्ह्याच्या सरासरीच्या पुढे आहेत. अन्य सर्व तालुके जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा मागास ठरले आहेत. दौंड नीचांकी असून मुळशी, हवेलीतही चिंताजनक परिस्थिती आहे.

तालुका शाळा.........परीक्षार्थी.........पात्र.........अपात्र.........निकाल.........शिष्यवृत्तीधारक
शिरूर.........१५३.........४३०९.........२०९९.........२११८.........४९.७७.........३५७
खेड.........२३४.........५२६०.........१५४६.........३५०३.........३०.६१.........१९०
आंबेगाव.........९०.........१७६२.........६६६.........१०६६.........३८.४५.........८३
इंदापूर.........१२७.........२७४१.........६९७.........१९९६.........२५.८८.........५२
पुरंदर.........१०२.........१७४२.........३९९.........१३१९.........२३.२२.........४६
मावळ.........१६३.........३१९९.........१०६७.........२०५०.........३४.२३.........३९
बारामती.........१३०.........३०६१.........८१२.........२१९०.........२७.०१.........३२
हवेली.........१६६.........४४२५.........८०७.........३३८०.........१९.२७.........२९
जुन्नर.........१६०.........२७०६.........५९९.........२०४९.........२२.६२.........२८
दौंड.........१४९.........३०३०.........४१४.........२५२९.........१४.०६.........१५
भोर.........१२१.........१३९७.........६८९.........६८६.........५०.१०.........७
राजगड.........६६.........३८५.........१५७.........२२२.........४१.४२ .........३
मुळशी.........९२.........२६८२.........४७९.........२०२३........
.१९.१४.........१
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT