पुणे

कुलकर्णी यांच्या बडतर्फीची मागणी

CD

सोमेश्वरनगर, ता. १७ : जालना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकास लाथेने मारहाण करणारे पोलिस उपअधिक्षक अनंत कुलकर्णी यांना बडतर्फ करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्यदिनी पोलिसांच्या निष्क्रियतेविरूद्ध न्याय मागण्यासाठी काही नागरिकांनी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. या नागरिकास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मुलासमोर कुलकर्णी यांनी पाठीमागून उडी मारून लाथ घातली. पोलिस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने अशोभनीय कृत्य करत चिमुकल्या लेकराच्या मनावर आयुष्यभराचा आघात केला आहे. तसेच, भारतीय राज्यघटनेच्या कलम २१नुसार प्रत्येक व्यक्तीस सन्मानाने जीवन जगण्याचा, वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कुलकर्णी यांनी या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले आहे. अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या संशयिताच्याही सन्मानाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्याने जनमानसावर अत्यंत गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जालना जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक यांनाही पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी- कोकणातील उष्णतेचा परिणाम हापूस आंब्यावर

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

Shendra MIDC fire: शेंद्रा MIDC हादरली! प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान?

SCROLL FOR NEXT