सोमेश्वरनगर, ता. ५ ः कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नानासाहेब आप्पासाहेब माळशिकारे यांचा ऊस वीजकंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळाला होता. यानंतर शेतकऱ्याने वीजकंपनीला मागतील तेवढी कागदपत्रे पुरविली आणि अखेर वीजकंपनीने दोन वर्षांनी का होईना शेतकऱ्यास ८३ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली आहे.
माळशिकारे यांच्या शेतातून महावितरण कंपनीची वीजवाहिनी गेली आहे. या वीजवाहिनीच्या तारांचे झोळ तयार झाले होते. त्यामुळे १३ ऑक्टोबर २०२३ मध्ये सायंकाळच्या वेळी जोराचे वारे वाहत असताना तारांच्या घर्षणातून ठिणग्या निर्माण झाल्या आणि उसाला आग लागली. अडीच एकरांपैकी एक एकर ऊस पेटला. उसासोबत ठिबक सिंचन प्रणालीही जळून खाक झाली. यानंतर शेतकऱ्याने तलाठी, वीजकंपनी यांना प्रस्ताव दिले. सोमेश्वर कारखान्याकडून बिले घेतली, तर कृषी विभागाकडून नुकसानीचे मूल्यांकन केले. यानंतर वीजकंपनीकडे १ लाख १४ हजार नुकसानभरपाईचा प्रस्ताव दिला होता. शेतकऱ्याने अविरत संघर्ष केल्याने ८३ हजार ३०० रुपये मंजूर करण्यात आले. शेतीपंपाच्या वीजबिलाची थकबाकी वजा करून शेतकऱ्याच्या खात्यावर ७४ हजार ८०० रुपये पाठविण्यात आले.
मी आधी पंचनामे करून घेतले. जळालेला ऊस पशुपालकांना मोफत दिला. सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या मदतीने वीजकंपनीकडे भरपाईचा प्रस्ताव पाठविला. पंधरा दिवसांनी त्रुटींची पूर्तता केली. बारामती येथे प्रस्ताव केल्यावर पुन्हा त्रुटी काढल्या त्याही पूर्ण केल्या. त्यानंतर प्रस्ताव पुण्यात गेला. तिथेही त्रुटी निघाल्या. त्याही पूर्ण केल्या आणि भरपाई मिळविली. महावितरणच्याही अधिकाऱ्यांचे सहकार्य झाले.
- नानासाहेब माळशिकारे, शेतकरी
वीजकंपनीने एकदाच कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. शेतकऱ्याला वारंवार हेलपाटे मारायला लावू नयेत. नुकसान भरपाईची प्रकरणे दोन- तीन वर्षे प्रलंबित न ठेवता तीन महिन्यात मार्गी लावावीत. यापुढेही जळीत झालेल्या शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने सर्व मदत केली जाईल.
- ऋषिकेश गायकवाड, संचालक
04861
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.