पुणे

सोमेश्वर कारखान्याने दुकानांसमोर ठोकले पत्रे

CD

सोमेश्वरनगर, ता. १० : सोमेश्वर कारखान्यास मिल, ट्रीपलर उभारणीसाठी व रस्ता रुंदीकरणासाठी जागा अत्यावश्यक आहे. याकरिता जुनी दुकानलाइन हटवून संबंधित व्यवसायिकांना नव्याने गाळे काढून देण्याचा प्रस्ताव कारखान्याने दिला होता. यास ९२ पैकी ७८ लोकांनी त्यास संमतीपत्रेही दिली. मात्र काही मोजक्या लोकांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा मार्ग पत्करल्याने गाळे बांधणी आणि रस्ता रूंदीकरण रखडले आहे. त्यामुळे अखेर कारखान्याने दुकानांसमोर आपल्याच मोकळ्या जागेत सोमवारी (ता.१०) पत्रे ठोकले आहेत.


‘‍सोमेश्वर’च्या जागेत करंजेपूल-कारखाना रस्त्यालगत ९२ लोक वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. मात्र आता कारखाना नऊपट मोठा झाला असून निर्वेध ऊस वाहतुकीसाठी रस्ता रूंद करणे अत्यावश्यक आहे. तसेच ऊसतोड मजुरांना उतरवणे व ट्रिपलर, मिल बांधण्यासाठी जागा उरली नाही. यामुळे सभासदांनी वार्षिक सभेत जुनी दुकानलाईन हटवून तिथेच मागे सरून नवे गाळे स्वखर्चाने बांधून देण्याचा प्रस्ताव दिला होता. तरीही ५७ लोक बारामती न्यायालयात गेले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सर्व व्यावसायिकांना आश्वस्त केले. संचालक मंडळाने समक्ष चर्चेतून विनाअनामत तीन प्रकारचे गाळे बांधून देण्याचा मार्ग काढला. त्यामुळे ७८ लोकांनी कारखान्यास संमतीपत्रेदेखील दिली.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे अतिक्रमण तर कुणीच काढले नाही. परिणामी संतप्त झालेल्या सभासदांच्या आग्रहानुसार संचालक मंडळाने अखेर पोलिस बंदोबस्तात दुकानांसमोर अंतर ठेवून पत्रे ठोकले. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.


चार-आठ हटवादी व्यवसायिकांपायी आम्हा सामान्य व गरीब व्यवसायिकांची फरफट होऊ नये. ज्यांनी कारखान्याच्या प्रस्तावास संमती दिली आहे आणि जे न्यायालयीन बाबीतून बाहेर पडत आहेत त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी अपेक्षा नाव न सांगण्याच्या अटीवर सामान्य व्यवसायिकांनी व्यक्त केली. तर कारखाना व्यवस्थापनानेही सहमती असणारांबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे.
05070

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : नागपूरमध्ये अजनी रेल्वे स्थानकावर हायलर्ट ; डॉग्सस्कॉड कडून तपासणी

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT