पुणे

करंजे येथे रॅली, व्याख्यान

CD

सोमेश्वरनगर, ता. २६ : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील परिसरातील संविधानप्रेमी नागरिक मंच आणि करंजे ग्रामपंचायत यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन केले होते. संविधानाचा आणि लोकशाहीचा जयघोष करत सोमेश्वर कारखान्यावरील शिवपुतळा ते करंजे येथील भीमपुतळा अशी दुचाकी रॅली पार पडली. याप्रसंगी व्याख्यान, रोपवाटप, संविधान शपथ असे उपक्रमही पार पडले.
करंजे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सोमेश्वर कारखान्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. सोमेश्वर कारखाना- करंजेपूल- करंजे अशी रॅली पार पडली. भारत ज्ञान विज्ञान समुदाय, आजी-माजी सैनिक संघटना, बौद्ध युवक संघ आदींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी उद्योजक दीपक साखरे, सरपंच हेमंत गायकवाड, वैभव गायकवाड, तुषार सकुंडे, शिवाजी शेंडकर, सुनील केंजळे, योगेश सोळसकर, प्रसाद सोनवणे, डॉ. सुधीर साळवे, अनिल हुंबरे, महेश शेंडकर उपस्थित होते.
करंजे येथे सोमेश्वर विद्यालयाच्या भागशाळेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर यांच्या हस्ते संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित व विद्यार्थी यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले आणि समता- बंधुता पाळण्याची शपथ घेतली. यावेळी सचिन पाटोळे, बंटी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब हुंबरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी, तर नानासाहेब लोणकर यांनी आभार मानले.

रोपांचे वाटप
करंजे येथे मु. सा. काकडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे- देशमुख यांचे ‘संविधान आणि आजची सद्यःस्थिती’ या विषयावर व्याख्यान पार पडले. तर बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार यांनी ‘संविधानाची गरज’ या विषयावर मांडणी केली. तसेच फॉर्टीन ट्री फाउंडेशनच्या वतीने व्यवस्थापक अनंत तायडे यांच्या हस्ते ५०० रोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT