पुणे

‘सोमेश्वर’ने पहिली उचल ३५०० रुपये प्रतिटन द्यावी

CD

सोमेश्वरनगर, ता. २७ : सोमेश्वर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाची पहिली उचल प्रतिटन ३३०० रुपये देऊन सभासदांची दिशाभूल केली असून, त्याऐवजी प्रतिटन ३५०० रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली. तसेच, मागील चार वर्षात एकरकमी एफआरपी न देऊन कायद्याची पायमल्ली केली आहे. याबाबत न्यायालयीन लढाई लढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने गतहंगामातील शिल्लक साखरेचे ३६२३ रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन धरले, पण प्रत्यक्षात ३७२५ रुपये दर मिळाल्याने साडेबारा कोटी शिल्लक आहेत. तसेच, कारखान्यावर मालतारण कर्ज नाही. बगॅस, साखर, वीज, इथेनॉल विक्रीतून पैसे मिळत असल्याने ३५०० रुपये दर सहज शक्य आहे. साखरेला २८९० रुपये उचल मिळते, ही दिशाभूल केली असून, राज्य बँकेने ३६०० रुपये मूल्यांकन करून ३२४० रुपये उचल देऊ केली आहे. सोमेश्वर कारखान्याने शेजारच्या खासगी कारखान्याशी तुलना करू नये. कारण, सोमेश्वरचा साखर उतारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या तोडीचा आहे. त्यांच्याप्रमाणे पहिली उचल ३५०० रुपये का दिली नाही? याचा खुलासा अध्यक्षांनी करावा. तसेच, अध्यक्ष व काही संचालकांच्या उपस्थितीतच मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एकरकमी एफआरपीची मागणी केली होती. त्यामुळे एकरकमी एफआरपीचे श्रेय कृती समितीस आहे, असा दावा सतीश काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
अध्यक्षांच्या आडमुठ्या धोरणामुळे सभासदांची मागणी नसताना चालू हंगामात फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये तुटणाऱ्या उसाला अनुदान जाहीर करावे लागले. मागील काळात किती अनुदान दिले, हे सभासदांना माहिती आहे. सोमेश्वर कारखान्याला सभासद ऊस देणार नाहीत, या भितीने सदर अनुदान देण्याऐवजी ३५०० रुपये उचल दिली असती, तर अनुदानाचा खर्च वाढला नसता, असा सल्लाही काकडे यांनी दिला.
सोमेश्वर कारखान्याने चार वर्षे एफआरपी विलंबाने किंवा दोन टप्प्यात दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना विलंब कालावधीचे सहा ते साडेसहा कोटी रुपये व्याज मिळणे आवश्यक आहे. यासाठी न्यायालयात दावा केला आहे. कारखान्यास व प्रशासनास न्यायालयाने नोटीस दिल्या आहेत. ८ डिसेंबरच्या अंतिम सुनावणीनंतर लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे सतीश काकडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT