सोमेश्वरनगर, ता. ३ : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविलेल्या अंदाजानुसार चालू साखर हंगाम साखर उत्पादनाच्या आणि साखर उताऱ्याच्या दृष्टीने ‘गोड’ ठरणार आहे. देशात गतहंगामापेक्षा ५३ लाख टन जादा म्हणजेच ३१५ लाख टन साखरनिर्मिती होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी एकूण १० लाख टन अतिरिक्त (एकूण २५ लाख टन) साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी ‘एनएफसीएसएफ’ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच एमएसपी (किमान साखर दर) वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (एनएफसीएसएफ) देशाचे साखर उत्पादनाचे अंदाज जाहीर केले. मागील हंगामात २६१ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. चालू हंगामात ३५ लाख टन साखर इथेनॉलनिर्मितीकडे वळविली जाईल. यानंतरही उत्पादन वीस टक्क्यांनी वाढून ३१५ लाख टनांवर पोचेल..
सद्यःस्थितीत देशातील तेरा राज्यात आतापर्यंत ४२४ कारखाने सुरू झाले आहे. देशात ४१ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. साखर उतारा आतापर्यंत गतहंगामापेक्षा (८.२९ टक्के) चांगला म्हणजेच ८.५२ टक्के इतका आहे. अनुकूल हवामानामुळे उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांचा उतारा वाढण्याचा ‘ट्रेंड’ दिसून येत आहे.
चालू हंगामाला सामोरे जाताना एक ऑक्टोबरला ५० लाख टन साखर शिल्लक आहे. ३१५ लाख टन साखरनिर्मिती झाल्यावर एकूण ३६५ लाख टन साखर उपलब्ध होईल. २९० लाख टन साखर देशांतर्गत खपेल आणि हंगामाअखेर ७५ लाख टन साखरेचा बोजा डोक्यावर राहील. त्याने कारखान्यावरील व्याजाचा बोजा वाढेल. केंद्र सरकारने नुकताच १५ लाख टन साखरनिर्यातीचा निर्णय घेतला आहे. मात्र तो अपुरा असल्याची साखर उद्योगाचे स्पष्ट मत होते.
‘साखरेचा दर राहणार स्थिर
‘एनएफसीएसएफ’ने आणखी १० लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे साखरेचे दर स्थिर राहतील, अशी माहिती अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. तसेच साखरेच्या एमएसपीचा निर्णय दीर्घकाळ प्रलंबित आहे. तो प्रतिकिलो ४१ रुपये करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
अपेक्षित साखर निर्मिती (लाख टनांत)
उत्तरप्रदेश ............११०
महाराष्ट्र............१०५,
कर्नाटक............५५
गुजरात............८
गाळप, साखर, अंदाज (लाख टनांमध्ये)
राज्य...........कारखाने...........गाळप...........साखर...........साखर उतारा (टक्के)...........अंदाज
महाराष्ट्र ...........१७०...........२१३...........१६.७५...........७.८५...........११०
उत्तर प्रदेश...........११६...........१५१...........१४.१०...........९.३०...........१०५
कर्नाटक...........७५...........९३.१८...........८.२०...........८.८०...........५५
गुजरात...........१४...........१०.५९...........०.५९...........८.५०...........८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.