संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २० : चालू साखर हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यात १८४ साखर कारखान्यांनी ३६७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातून ३० लाख टन साखरनिर्मिती केली आहे. गतहंगामाच्या तुलनेत साखर उतारा ०.३० टक्क्यांनी अधिक आहे. साखर उतारा आणि गाळप या दोन्ही बाबींमध्ये खासगींपेक्षा सहकारी साखर कारखाने पुढे आहेत. दरम्यान, गाळपात सोलापूर जिल्हा तर साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
राज्याचा साखर हंगाम एक नोव्हेंबरला सुरू झाला. साखर आयुक्तालयाच्या १५ डिसेंबरच्या अहवालानुसार राज्यात २२० पैकी १८४ साखर कारखाने सुरू होऊ शकल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात १२०० लाख टन ऊस उपलब्ध असून, त्यापैकी २५ ते ३० टक्के ऊस दीड महिन्यात संपला आहे. राज्यात थंडीचा अनुकूल परिणाम होत असून मागील हंगामाच्या तुलनेत साखरनिर्मिती आणि साखर उतारा अधिकचा आढळून येत आहे. गाळपाबाबत सोलापूर जिल्हा सर्वात पुढे आहे. कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, सातारा या जिल्ह्यांनीही समाधानकारक गाळप केले आहे. साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे कोल्हापूर आणि सांगलीचा दबदबा कायम राहिला आहे. पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याचा उताराही समाधानकारक आहे. त्यामुळे साखरेचे दर टिकल्यास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा ठेवता येणार आहे.
चालू हंगामात खासगीपेक्षा सहकारींची संख्या घटली आहे. मात्र तरीही गाळप आणि साखर उतारा या दोन्ही बाबतीत सहकारींची सरशी झाली आहे. त्यामुळे दराच्या स्पर्धेतही सहकार बाजी मारणार असल्याचे दिसून येते.
कारखाने संख्या......गाळप(टन)......साखर (क्विं.)......उतारा (टक्के)
सहकारी......९१......१९०५६३९४......१६९८७५९१......८.९१
खासगी...... ९३......१८०२९३४५......१४०१३५८५......७.७७
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा संख्या गाळप(टन)......साखर(क्विं.)......उतारा (टक्के)
सोलापूर......३०......६१०२९०२......४८६८९८५......७.९८
कोल्हापूर......२०......५०८१३१०......४९८७७४५......९.८२
पुणे......१३......४६६३२७५......३९६७६०१......८.५१
अहिल्यानगर......२०......४१६१३५९......३१६९५५०......७.६२
सातारा......१६......४००७८४१......३५९४३७५......८.९७
सांगली......१५......३३२५१७७......३२०५६५१......९.६४
धाराशिव......१२......१८७३८४१......११३३१५०......६.०५
लातूर......१२......१४०४६२९......११४७३९८......८.१७
बीड......८......१३९४३८९......८९१०६५......६.३९
छ.संभाजीनगर......८......९९७७५४......८३८७९१......८.४१
परभणी......६......९७७०२०...... ७३९५१०......७.५७
जालना......५......८५७८६९......६२४२५०......७.२८
नांदेड......६......६३६७४९......५२६९४०......८.२८
हिंगोली ......५......५५५६८२......४६५४००......८.३८
नाशिक ......५......३२४२७९......३०९७४५......९.५५
यवतमाळ......३......३२००५८......२६३१७५......८.२२
नंदुरबार......१......२६८०५५......१५४५००......५.७६
बुलडाणा......१......६८१५०......६२०४५......९.१
जळगाव......१......६५४००......५१३००......७.८४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.