पुणे

नोटरी असोसिएशनच्या संघटकपदी आळंदीकर

CD

सोमेश्वरनगर, ता. १४ ः महाराष्ट्र राज्य नोटरी प्रॅक्टिशनर असोसिएशन या नोंदणीकृत संघटनेच्या पुणे जिल्हा संघटकपदी करंजेपूल (ता. बारामती) येथील नोटरी अॅड. गणेश आळंदीकर यांची निवड झाली. अॅड. आळंदीकर हे गेली १८ वर्षे तालुका, जिल्हा व मुंबई न्यायालयात वकिली करत असून, वर्ष २०१९पासून भारत सरकारचे नोटरी म्हणून कार्यरत आहेत. ते माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी नोटरीची मोफत कामे करतात. वकिलांची शिखर परिषद असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आळंदीकर यांना बार कौन्सिलचे राज्याचे अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अॅड. हरीश तावरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष अॅड. इब्राहिम शेख, ॲड. राजेंद्र उमाप, अॅड. ए. यू. पठाण, पुणे बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड, अॅड. दीपक चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी नोटरी असोसिएशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा म्हणून ॲड. स्वाती गिरंजे, पुणे शहर सचिव पदी ॲड. आरती गोरडे यांनाही जबाबदारी देण्यात आली.

05262

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT