पुणे

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पाय खोलात

CD

सोमेश्वरनगर, ता. १४ : अमेरिकेशी भारताच्या झालेल्या व्यापार करारानंतर आधीच गोत्यात असलेल्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. सोयाबीनचे बाजारभाव प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी घसरले आहेत. प्रतिक्विंटल ५५०० ते ५६०० रुपये असणारा भाव ५१०० पर्यंत खाली आला आहे. आधीचे बाजारभावही परवडणारे नव्हते. असे असताना हमीभावापेक्षाही बाजारभाव कोसळले आहेत.

व्यापार करारामुळे सोया ऑइल आयात केले जाणार की कराराच्या नावाखाली जाणीवपूर्वक दर पाडले जात आहेत. हा संभ्रम सरकारी पातळीवरून दूर करावा, असे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव मिळत होता. मात्र, गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना अजिबात न परवडणारा भाव घ्यावा लागत आहे. पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीवेळी प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. सोयाबीनला सन २०२५-२६ मध्ये हंगामासाठी ५३२८ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊ केला. सरकारने विविध ठिकाणी सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्रेही सुरू केली. यामुळे सोयाबीनचे बाजारभाव निदान ५५०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु फेब्रुवारीत अमेरिका व भारत यांच्यात अंतरिम व्यापार करार झाला असून, मार्चअखेर त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या करारात सोयाबीन वगळण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, सोया ऑइल येणार असल्याचे संकेत आहेत. त्या आयातीच्या भीतीने आणि संभ्रमामुळे सोयाबीनच्या कशाबशा वाढलेल्या भावात घसरण सुरू झाली आहे.

सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे
बारामती बाजार समितीत तीन फेब्रुवारीला सोयाबीनला सरासरी पाच हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तोच १० फेब्रुवारीला पाच हजार १५० रुपयांवर घसरला आहे. लातूरच्या प्रसिद्ध सोयाबीन बाजारात तीन फेब्रुवारीला ५६३४ रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तो आज ५२४५ रुपये प्रतिक्विंटलवर घसरला आहे. डागी सोयाबीनला तर ४६९९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. हे दर हमीभावापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर पाणी फेरले जाणार आहे. कराराच्या आडून व्यापारी भाव पाडत आहेत का? यातही सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.

केंद्र सरकारने सोयाबीन, मका याची आयात करणार नाही असे म्हटले आहे पण माझा तरी त्यांच्यावर विश्वास नाही. कारण अमेरिकेचे अध्यक्ष आणि कृषिमंत्री यांनी अमेरिकेच्या शेतकऱ्यांना भारताची मोठी बाजारपेठ खुली झाली असल्याचे स्पष्ट विधान केले आहे. सोयाबीन आणणार नसले तरी छुप्या मार्गाने सोया तेल किंवा सोया पेंडची आयात केली तरी सोयाबीनचे बाजारभाव कोसळतात.
- राजू शेट्टी, शेतकरी नेते

केंद्र सरकारने यापूर्वीही सोया पेंड व सोया ऑइल आयात करून बाजारभाव पडलेले आहेत. आता नव्या व्यापार करारामुळे सोयाऑइल आयात केले जाणार आहे की, कराराच्या नावाखाली जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांकडून दर पाडले जात आहेत हा संभ्रम सरकारी पातळीवरून दूर करावा.
मनोहर कदम, सोयाबीन उत्पादक मुरूम (ता. बारामती)


बारामती बाजार समितीतील बाजारभाव (प्रतिक्विंटलमध्ये)
२७ जानेवारी - ५५७१
३ फेब्रुवारी - ५५५५
१० फेब्रुवारी - ५१५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Pune News: माहोल तोच, फक्त अजितदादांच्या जागी सुनेत्रावहिनी; बारामतीतील जनता दरबारात निवेदनांवर जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना!

Ind vs Pak T20 World Cup: तर पाकचा आश्चर्यकारक विजय... आजचा सामना कोण जिंकेल? अभिषेक शर्मा किती धावा काढेल? मॅचपूर्वी मोठं भाकीत समोर

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT