पुणे

राख सोसायटीतील अनागोंदी चव्हाट्यावर

CD

सोमेश्वरनगर, ता. २१ : राख (ता. पुरंदर) येथील राख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. एका ज्येष्ठ संचालकाने सोसायटीच्या सन २०१४ ते सन २०१९ या कालावधीतील फेरलेखापरीक्षणाची आणि नवा सचिव देण्याची मागणी सहकार विभागाकडे केली आहे. तालुक्याच्या सहायक निबंधकांनी गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांशी पत्रव्यवहारही केला आहे. दरम्यान, सोसायटीच्या सचिवांनी स्वतःहूनच राजीनामा देऊ केला आहे.
राख सोसायटीत २०२३ च्या चाचणी लेखापरीक्षणावरून गैरव्यवहार उजेडात आला होता. आता नव्या लेखापरीक्षण अहवालावरून वाद सुरू आहेत. सोसायटीत तक्रारीनंतर सन २०१४ ते सन २०१६ या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण सन २०२३मध्ये झाले. यात शासनाची कर्जमाफीत फसवणूक झाल्याचे आणि एकूण ७ लाख ८५ हजारांचा गैरव्यवहार समोर आला होता. सचिवावर गुन्हा दाखल झाला. यानंतर सदर रकमा सचिवाने संस्थेकडे भरल्या, मात्र न्यायालयीन बाब अजून सुरू आहे. आता सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालात अनिष्ट तफावत आढळली आणि तोटा ७३ लाख रुपयांवर पोहोचल्याचे निष्पन्न झाले. काही नावांवर दुबार कर्जे, गरजेपेक्षा जास्त कर्जे दिल्याचे आढळून आले आणि पुन्हा वाद चव्हाट्यावर आले.
सोसायटीचे सन २०१४ ते सन २०१६चे लेखापरीक्षण अपुऱ्या कालावधीचे होते. सन २०१४ ते सन २०१९ या संपूर्ण पंचवार्षिक कालावधीचे लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच, सचिवांच्या नावे मागीलप्रमाणे पुन्हा चालू अहवालात ५६ हजार रक्कम आढळून आल्याने त्यांना बडतर्फ करून नवा सचिव मिळावा, अशीही मागणी सहकार विभागाकडे केली आहे, अशी माहिती संचालक यशवंत रणनवरे व सभासद मनोज रणनवरे यांनी दिली.

सचिव श्रीकृष्ण पवार म्हणाले, ‘‘सोसायटीतील राजकारणाला कंटाळून व नाहक त्रासामुळे मी राजीनामा दिला आहे. मागील लेखापरीक्षणातील येणे रक्कम तेव्हाच संस्थेत भरलेली आहे. आताच्या लेखापरीक्षणानुसार माझ्या नावे केवळ १८ हजार येणे आहे.’’

याबाबत सहायक निबंधक डॉ. यशवंती मेश्राम यांनी जिल्हा उपनिबंधकांना सन २०१४ ते सन २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षणाबाबत उचित निर्णय घ्यावा, असे विनंती पत्र दिले आहे. तसेच, नवीन सचिव नेमण्यासंदर्भात उचित कार्यवाही करावी, असे पत्रही पुणे जिल्हा देखरेख संघाला नुकतेच दिले आहे.

संचालक वर्षा माने अपात्र
सहकार विभागाच्या तपासणीत राख सोसायटीच्या विद्यमान संचालक वर्षा महेंद्र माने यांची ३१ मार्चअखेर ११ हजार ४५३ रुपये कर्ज थकबाकी आढळून आली होती. मुदतीनंतर मात्र ती भरण्यातही आली आहे. मात्र, याप्रकरणी माने यांना डॉ. यशवंती मेश्राम यांनी संचालकपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश काढला आहे. याबाबत वर्षा माने म्हणाल्या, ‘‘संस्था उत्तम स्थितीत आहे. संस्थेत माझी अनामत रक्कम शिल्लक होती. तांत्रिकदृष्ट्या ती कर्जखात्यावर घेतली गेली नसल्याने मार्चअखेर थकबाकी दिसली. ती भरली आणि कुटुंबातील मध्यम मुदत कर्जही एकरकमी ६५ लाख भरून नील केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT