पुणे

वाघळवाडीच्या उपसरपंचपदी जितेंद्र सकुंडे यांची निवड

CD

सोमेश्वरनगर, ता. २३ ः वाघळवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी मतैक्य न झाल्याने अखेर सोमवारी (ता. २३) निवडणूक पार पडली. चुरशीने झालेल्या निवडणुकीत जितेंद्र चंद्रकांत सकुंडे यांनी उपसरपंचपदी बाजी मारली. सकुंडे यांनी मागील पंचवार्षिक कालावधीतही पाच वर्षे उपसरपंचपद भूषविलेले आहे. मावळते उपसरपंच तुषार सकुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच ॲड. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी जितेंद्र सकुंडे, अनिता दडस आणि निशिगंधा सावंत या तिघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. याप्रसंगी गुप्त मतदानपद्धतीचा उपयोग करण्यात आला. चुरशीच्या लढतीत सकुंडे आणि दडस यांना प्रत्येकी सहा अशी समसमान मते पडली. निशिगंधा सावंत यांना एक मत मिळाले. समसमान मते पडल्याने निर्णायक मतदानाचा अधिकार सरपंच ॲड. गायकवाड यांनी सकुंडे यांच्या बाजूने बजावला. त्यामुळे सकुंडे यांची निवड जाहीर करण्यात आली. प्रशासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले यांनी पाहिले. दिलीप धुमाळ यांनी सहकार्य केले.

05408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT