पुणे

सोमेश्वरनगरमधील सायकल स्पर्धेत २०० जणांचा सहभाग

CD

सोमेश्वरनगर, ता. २३ : सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर सायकलिंग क्लबच्या वतीने शिव सायकलिंग चॅलेंज स्पर्धा पार पडली. स्पर्धेत २०० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुचाकीऐवजी सायकलची गोडी वाढावी, यासाठी सायकल स्पर्धा आयोजित केली होती. रविवारी (ता. २२) झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून करण्यात आले. सोमेश्वर कारखान्यावरील शिवछत्रपती यांच्या पुतळ्यापासून सोमेश्वर मंदिर अशी एकूण १० किलोमीटर अंतराची स्पर्धा झाली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय आणि दिशादर्शक फलक लावल्यामुळे स्पर्धकांना सुलभता झाली. बहुतांश स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. त्यांना प्रशस्तिपत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले. सोमेश्वर सायकलिंग क्लबच्या स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले. पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, कारखाना व्यवस्थापन यांनी सहकार्य केले. होळ येथील सचिन आर्ट्स यांनी स्पर्धकांसाठी अल्पोपाहार व मेडल्स, तर समर्थ कॉम्प्युटर यांनी प्रमाणपत्रासाठी सहकार्य केले.

05411

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT