पुणे

सोमेश्वर सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

CD

सोमेश्वरनगर, ता. २४ : येथील श्री सोमेश्वर कामगार सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जयकुमार विलास भोसले यांची तर उपाध्यक्षपदी राहुल जयराम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राहुल खलाटे व हनुमंत भापकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागी निवडप्रक्रिया पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रक्रियेस सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि बारामती तालुका साखर कामगार सभेचे अध्यक्ष राजेंद्र तावरे, माजी कामगार संचालक बाळासाहेब काकडे यांच्या उपस्थितीत निवडी बिनविरोध झाल्या. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी, संस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक आणि डिजिटल करू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय खोमणे, तानाजीराव सोरटे, संतोष भोसले, प्रमोद खलाटे, राहुल खलाटे, हनुमंत भापकर उपस्थित होते. सचिव महेश भोसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

Latest Marathi News Live Update : 25000 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT