पुणे

सोमेश्वर कारखान्याकडून उच्चांकी गाळप

CD

सोमेश्वरनगर, ता. २५ : ऊसटंचाईच्या काळातही येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने बुधवारी (ता.२५) दुपारपर्यंत उच्चांकी अकरा लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात ११.७२ टक्के इतका सर्वाधिक उतारा प्राप्त करत १२ लाख ८० हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याकडून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण गाळप उरकेल, अशी माहिती सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

सोमेश्वर कारखान्याने आजपर्यंत ११६ दिवसांत दैनंदिन साडेनऊ हजार टन प्रतिदिन अशा उच्चांकी क्षमतेने अकरा लाख टन गाळप केले आहे. दैनंदिन साखर उतारा तब्बल तेरा टक्के आहे. त्यामुळे अंतिम सरासरी उतारा बारा टक्क्यांच्या पुढेच असणार आहे. ‘सोमेश्वर’ने हंगामाच्या सुरुवातीलाच साडेतेरा ते चौदा लाख टन गाळप करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. अपवाद वगळता सभासदांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने कारखाना मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालेल आणि साडेतेरा लाख टन गाळप पूर्ण होईल, असा अंदाज आहे. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे म्हणाले, सध्याच्या गाळपात सोमेश्वर जिल्ह्यात तिसरा तर राज्यात आठवा आहे. तसेच साखर उताऱ्यात सोमेश्वर जिल्ह्यात प्रथम आहे.

एक मार्चपासून ३५०० रुपये उचल
सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये प्रतिटन जाहीर केली आहे. मात्र फेब्रुवारी व मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला अधिकचे प्रोत्साहन अनुदान देत आहोत. त्यामुळे एक फेब्रुवारीपासून तुटणाऱ्या उसाला ३४०० रुपये उचल अदा केली आहे. तर एक मार्चपासून तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन उचल देणार आहोत, अशी माहिती जगताप यांनी दिली.


केंद्र सरकारने दिलेल्या ८३ हजार ५०० क्विंटलच्या कोट्यापैकी सोमेश्वर कारखान्याने ६७ हजार क्विंटल साखर दोन टप्प्यांत निर्यात केली आहे. साध्या साखरेला ३७७० तर मोठ्या साखरेला ३८५० रुपये प्रतिक्विंटल असा चांगला दर मिळाला. त्याचा सभासदांना अंतिम दर देताना उपयोग होणार आहे. तसेच उरलेला १६ हजार ५०० क्विंटल कोटा आणि नव्याने मिळणार असलेला कोटा जागतिक बाजार पाहून निर्यात केला जाणार आहे.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक

दृष्टिक्षेपात
वीजनिर्मिती ...........९ कोटी १६ लाख युनिट
वीजनिर्यात........... ६ कोटी १४ लाख युनिट
बी हेवी मोलासेसनिर्मिती...........१६ हजार ५०० टन
अल्कोहोलनिर्मिती...........५६ लाख लिटर
इथेनॉलनिर्मिती ...........३२ लाख लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT