सोमेश्वरनगर, ता. ५ ः निंबुत (ता. बारामती) येथील तलाठी व मंडल अधिकारी यांच्या नावाने सातबाऱ्यावरील नोंदीसाठी लाच मागितल्याप्रकरणी सोमनाथ संपत महानवर याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ५) गुन्हा दाखल केला आहे.
निंबुतच्या शेतकऱ्याने शेतीच्या गटामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून सहा गुंठ्यांचे चार प्लॉट तयार केले होते. त्यानुसार तहसीलदारांनी सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी निंबुतच्या गाव कामगार तलाठी जयश्री तनपुरे यांना ११ फेब्रुवारीला आदेश दिले. नोंदीसाठी शेतकरी निंबुत तलाठी कार्यालयात गेल्यावर कार्यालयातील सोमनाथ महानवर याने तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडल अधिकारी संतोष मोहिते यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर महानवरने तसा व्हॉटसॲप मेसेजही पाठविला. वैतागलेल्या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या प्राथमिक पाहणीत सोमनाथ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यासाठी २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मार्चला रचलेल्या सापळ्यात महानवर याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. सुहास हट्टेकर अधिक तपास करत आहेत.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
निंबुतच्या मागील तलाठ्यावरही लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्यानंतर दोन-तीन वर्षे पूर्णवेळ तलाठी नव्हते. तेव्हा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच खासगी इसम सोमनाथ महानवर याने सरकारी कार्यालयाचा ताबा घेतला होता. नवीन महिला तलाठी आल्यानंतरही महानवरच अर्थपूर्ण व्यवहार करत होता. त्यामुळे या लाचप्रकरणी तो एकटा नसून, तो ज्यांच्या हुकुमावरून लाच घेत होता. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.