पुणे

वाणेवाडीत कष्टकरी महिलांंचा सन्मान

CD

सोमेश्वरनगर, ता. १८ ः जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने वाणेवाडी (ता. बारामती) येथे २१ कष्टकरी महिला शेतकऱ्यांचा आणि गुणवंत मुलींचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘साद-संवाद स्वच्छता ग्रुप’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी विमल भोसले, सुमन शेटे-चव्हाण, सुवर्णा भोसले, सुजाता मुळीक, संगीता चव्हाण, छाया जाधव, अनिता भोसले, सुवर्णा जगताप, गव्हाबाई मोहोळकर, हिराबाई शिंदे, मंदाबाई कोंडे, बायसाबाई गाडेकर, शोभा जगताप, शिलाराणी भोसले, संगीता जाधव, छाया आवटे, लैला सय्यद, संगीता बामणे, हिराबाई पवार, कमल कोळेकर, शोभा शेळके या महिलांनी सन्मान स्वीकारला. यासोबत गावातील पहिली महिला सनदी लेखापाल म्हणून मान मिळवणारी वैभवी जगताप, तसेच एसबीआय बँकेमध्ये निवड झालेली भाग्यश्री साळुंखे व सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवलेली गायत्री भोसले या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने कलाकार रुचिका राजेश खोत यांचा ‘बांधारिचे बाय गं’ हा गाण्यांचा, लोकगीतांचा सांगीतिक नाट्यप्रयोग आयोजित केला होता.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डी. वाय. जगताप यांनी केले. अमृता नांदखिले यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता यादव-पवार व अपर्णा जेधे यांनी, तर गणेश सावंत यांनी आभार मानले.

05483

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT