पुणे

पायाभूत अध्ययन चाचणी आता डिजिटल

CD

सोमेश्वरनगर, ता. ९ : पुणे जिल्ह्यातील विविध व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या ३९ शाळांमध्ये १० एप्रिलला पायाभूत अध्ययन अभ्यास (एफएलएस-२६) या चाचणीचे आयोजन डिजिटल पद्धतीने करण्यात आले आहे. सदर चाचणीमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या कौशल्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (एनसीईआरटी) व ‘परख’ यांच्यामार्फत एफएलएस-२०२२ या पायाभूत चाचणीचे आयोजन पेपर-पेन पद्धतीने करण्यात आले होते. आता ‘एफएलएस-२०२६’ ही चाचणी मात्र टॅबलेट आधारीत असून गुणवत्ता व कार्यक्षमतेत वाढ आणि अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने प्रथमच डिजिटल प्लॅटफॉर्म वापरला जाणार आहे. एनसीईआरटीमार्फतच ‘फिल्ड इन्वेस्टीगेटर’ यांना शाळांमध्ये टॅबलेट्स पुरवण्यात येणार आहेत. या उपक्रमात देशभरातील ७७६ जिल्ह्यांतील दहा हजार शाळा आणि एक लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे व प्राचार्य महेश शेंडकर म्हणाले की, जिल्हा समन्वयकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३९ मुख्य आणि राखीव ५ ‘फील्ड इन्वेस्टीगेटर’ यांची नियुक्ती केली आहे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी व पालकांना माहिती द्यावी. जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात आणि अहवाल सादर करावा. अडचण असल्यास ०२०-२६४४३२४६ किंवा ८३८१०२३०७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्ह्यात एफएलएस-२०२६ मधील सहभागी शाळा
जिल्हा परिषद - ११
खाजगी अनुदानित - ५
खाजगी विनाअनुदानित- ८
केंद्रीय विद्यालय- ११
महानगरपालिका-४

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT