सोमेश्वरनगर, ता. ११ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे होळ (ता. बारामती) येथील प्रसिद्ध भैरवनाथ यात्रा यंदा केवळ धार्मिक विधी पार पाडून साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावर्षी कुस्त्या, तमाशा आणि मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या बैठकीत अजितदादांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हा निर्णय झाला. यात्रेतील मुख्य आकर्षण असलेले आतिषबाजी, डीजे, रात्रीचा व दिवसाचा तमाशा आणि कुस्त्यांचे जंगी मैदान रद्द करण्यात आले आहे. केवळ देवाचा अभिषेक, लग्नविधी आणि पारंपरिक मिरवणूक हे धार्मिक विधी पार पडतील. तसेच, होळमधील वायाळपट्टा येथील हनुमान जन्मोत्सव यात्राही रद्द केली असून, कांबळेवस्ती येथील भीमजयंती केवळ प्रतिमापूजन व महाप्रसादाने साजरी केली जाणार आहे. मिरवणूक आणि ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.