सोमेश्वरनगर, ता. २३ : ४१ ते ४२ डिग्री सेल्सिअस तापमानात बारामतीच्या पश्चिम भागात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसभर कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मागील निवडणुकांच्या तुलनेत मतदानाचा टक्का घटला होता.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सावट बारामतीकरांमधून अद्याप बाहेर पडले नसल्याचे आजच्या मतदानातून दिसून आले. त्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवत होता. त्यामुळे सकाळपासूनच काही गावांचा अपवाद वगळता मतदारांचा ओघ कमी जाणवला. दुपारी तीनपर्यंत चाळीस टक्क्यांच्या आसपास मतदानाचा आकडा पोहोचला होता. ऊन उतरल्यावर कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी शिकस्त केली आणि आकडा वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
सोमेश्वरनगर जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर सकाळी मतदानयंत्रांमधील त्रुटींमुळे अर्धा तास उशिरा मतदान सुरू झाले. शेंडकरवाडी मतदान केंद्रावर मतदार यादीतून काही महिलांची नावे कमी झाली होती. खंडोबाचीवाडी, गडदरवाडी परिसरात मतदारांचे प्रभाग बदलले गेले होते.
अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते किरण आळंदीकर हे दोन महिन्यांपूर्वी चारचाकीच्या भीषण अपघातातून सुदैवाने बचावले आहेत. पण, पायांना गंभीर दुखापत असल्याने ते सध्या व्हीलचेअरवरच आहेत. एकीकडे निरुत्साह असताना आळंदीकर मात्र अजित पवार यांना मतदानातून श्रद्धांजली द्यायची या जिद्दीने व्हीलचेअरद्वारे उत्साहाने मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. मतदान करून बाहेर पडताना नेमके सुनेत्रा पवार यांचे आगमन झाले आणि आळंदीकरांना अजित पवारांच्या आठवणीने अश्रू आवरले नाहीत. सुनेत्रा पवार यांनीच त्यांचे सांत्वन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.